salman khan alia bhatt viral photoshoot at joy awards 2024 with hollywood stars riyadh  SAKAL
मनोरंजन

Salman Khan - Alia Bhatt: सलमान-आलियाचं हॉलीवूडच्या जॉन सीनासोबत फोटोशूट, व्हिडीओ व्हायरल

सलमान - आलियाने हॉलिवूडच्या दिग्गज स्टार्ससोबत केलेलं फोटोशूट व्हायरल झालंय

Devendra Jadhav

Salman Khan Viral Photoshoot: सलमान खान हा बॉलिवूडचा भाईजान. सलनानने २०२३ मध्ये 'टायगर 3' आणि 'किसी का भाई किसी की जान' या सिनेमांच्या माध्यमातून वर्ष गाजवलं. सलमान काहीच दिवसांपुर्वी फुटबॉल स्टार रोनाल्डोला भेटला होता. आता सलमानच्या आयुष्यात आणखी एक खास गोष्ट घडलीय.

सलमानने हॉलिवूडच्या काही मोठ्या स्टार्ससोबतचा फोटो शेअर केलाय. तो अलीकडेच सौदी अरेबियातील रियाध येथे जॉय अवॉर्ड्स 2024 मध्ये गेलेला. या पुरस्कार सोहळ्यातला फोटो सलमानने शेअर केलाय.

सलमानचं फोटोशूट व्हायरल

सलमान खानने जॉय अवॉर्ड्स 2024 मधील फोटो शेअर केलाय. या फोटोत त्याच्यासोबत आलिया भट्ट आणि अनेक हॉलिवूड स्टार्सही दिसत आहेत. सलमानने हा फोटो शेअर करताच तो व्हायरल झाला आणि चाहते त्यावर जोरदार कमेंट करत आहेत.

फोटोमध्ये सलमान खान 'बॅटमॅन vs सुपरमॅन' आणि 'जस्टीस लीग'चे दिग्दर्शक झॅक स्नायडरसोबत उभा असून ग्रुप फोटोसाठी पोज देताना दिसतोय.

सलमान खानसोबत लोकप्रिय हॉलिवूड सुपरस्टार

एंटरटेनमेंट मेकर्स अवॉर्ड जिंकणाऱ्या बॉलीवूड स्टार आलिया भट्टसह सलमान खानने हॉलिवूड स्टार्ससोबत खास फोटोशूट केलं. या फोटोमध्ये अँथनी हॉपकिन्स, जॉन सीना, अँथनी अँडरसन, मार्टिन लॉरेन्स, टायसन फ्युरी, ग्लोरिया गेनोर आणि बेबे रेक्सा यांचा समावेश होता.

बेबे रेक्साने या व्हायरल फोटोचा पडद्यामागचा व्हिडिओही शेअर केला आहे. फोटोमध्ये कलाकार एकत्र जमून परफेक्ट फोटो घेण्यासाठी त्यांची जागा शोधताना दिसत आहेत. हा व्हिडिओही सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

सलमानने रियाधमध्ये अँथनी हॉपकिन्स यांची घेतली भेट

सलमान खानच्या रियाध भेटीची देशभरात चांगलीच चर्चा झाली. सलमानने प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेता-दिग्दर्शक अँथनी हॉपकिन्स यांची भेट घेतली. अँथनी हॉपकिन्स यांनी सुपरस्टार सलमान खानला भेटण्याचा त्यांचा अनुभव शेअर करून त्याचं कौतुक केले. याशिवाय या पुरस्कार सोहळ्यात सहभागी होऊन भाईजानसोबत आलियानेही भारताची शान वाढवली.

Tej Pratap Yadav : बिहार निवडणूक सुरू असतानाच केंद्र सरकारचा तेजप्रताप यादव बाबत मोठा निर्णय!

Kannad Election : उमेदवार शोधण्यासाठी राजकीय पक्षाची होतय दमछाक; कन्नडला अद्यापही युती, आघाडीसंदर्भात राजकीय पक्षांच्या हालचाली थंडच!

DMart New Sale : नवा आठवडा, नवा सेल! डीमार्टमध्ये उद्यापासून स्पेशल ऑफर सुरू, कोणत्या वस्तू मिळणार जास्त स्वस्त? पाहा एका क्लिकवर

Bopodi Land Scam : बोपोडी जमीन व्यवहार प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे; शीतल तेजवानीचे परदेशात पलायन?

Latest Marathi News Live Update : देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT