Bajrangi Bhaijaan
Bajrangi Bhaijaan  
मनोरंजन

'बजरंगी भाईजान'चा सीक्वेल येणार; राजामौलींचे वडील लिहिणार कथा

स्वाती वेमूल

२०१५ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'बजरंगी भाईजान' (Bajrangi Bhaijaan) या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तगडी कमाई केली होती. या चित्रपटातील सलमान खानच्या (Salman Khan) भूमिकेने चाहत्यांची मनं जिंकली होती. या चित्रपटाला सलमानच्या करिअरमधील उत्तम चित्रपटांपैकी एक मानलं जातं. आता सलमानने त्याच्या या सुपरहिट 'बजरंगी भाईजान' या चित्रपटाच्या सीक्वेलची घोषणा केली आहे. या सीक्वेलची कथा 'बाहुबली' फेम दिग्दर्शक एस. एस. राजामौली यांचे वडील के. व्ही. विजयेंद्र प्रसाद लिहिणार आहेत. 'RRR' या चित्रपटाच्या एका कार्यक्रमाला सलमानने हजेरी लावली होती. त्यावेळी त्याने चाहत्यांना ही खुशखबर दिली. यावेळी निर्माता-दिग्दर्शक करण जोहर, एस. एस. राजामौली यांच्यासह RRR चित्रपटातील कलाकार ज्युनिअर एनटीआर, रामचरण आणि आलिया भट्ट उपस्थित होते.

'बजरंगी भाईजान' या चित्रपटाचं दिग्दर्शक कबीर खानने केलं होतं. सलमानसोबत यामध्ये करीना कपूर आणि नवाजुद्दीन सिद्दिकी यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका होत्या. तर मुन्नीच्या भूमिकेतील हर्षाली मल्होत्रानेही विशेष छाप सोडली होती. १७ जुलै २०१५ रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. चुकून भारतात आलेल्या मुन्नीला पवन कशा पद्धतीने अडचणींचा सामना करत पाकिस्तानमध्ये तिच्या आईवडिलांकडे पोहोचवतो, याबद्दलची कथा चित्रपटात दाखवण्यात आली आहे.

'बजरंगी भाईजान'च्या सीक्वेलमध्ये करीना आणि नवाजुद्दीन झळकणार की नाहीत, याबद्दल अद्याप कोणतीच माहिती देण्यात आली नाही. तर मुन्नीच्या भूमिकेतील हर्षालीसुद्धा प्रेक्षकांना पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर पहायला मिळेल की नाही, हेसुद्धा अद्याप गुलदस्त्यातच आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Crash: निवडणुकीतील अनिश्चिततेमुळे निर्देशांकांची दीड टक्का घसरगुंडी; सेन्सेक्स १०६२ अंश घसरला

Blog : दाभोलकरांनंतर... युएन ते युगांडाकडून दखल, दोन कायदे अन् शाखांचा विस्तार

PBKS vs RCB Live Score : पंजाब किंग्जचंही चोख प्रत्युत्तर; रूसोची आक्रमक खेळी

Air India Express च्या केबिन क्रूचा संप संपला, 25 कर्मचाऱ्यांची बडतर्फी मागे घेणार

Virat Kohli PBKS vs RCB : पंजाब विराटवर फारच मेहरबान! पाच षटकात सोडले तीन कॅच; पाहा Video

SCROLL FOR NEXT