Salman Khan birthday..throwback story when he burnt father salim khan salary..
Salman Khan birthday..throwback story when he burnt father salim khan salary.. Esakal
मनोरंजन

Salman Khan: वडीलांचा अख्खा पगार जाळलेला सलमाननं.. त्यावेळी सलीम खाननी जे केलं ते क्वचितच घडत असेल..

प्रणाली मोरे

Salman Khan Birthday: बॉलीवूडचा दबंग खान सलमान खान २७ डिसेंबरला आपला ५७वा वाढदिवस साजरा करतोय. आपल्या भावंडांमध्ये सलमान सगळ्यात मोठा.. तो आजही आपल्या आई-वडीलांसोबत राहतो. इंडस्ट्रीत जसं सलमानचा सढळहस्ते मदत करण्याचा दिलदार स्वभाव सगळ्यांना माहित आहे तसाच त्याचा रागिटपणा देखील अनेकांनी अनुभवलाय.

एकदा तर सलमाननं आपले वडील सुप्रसिद्ध कथा लेखक सलीम खान यांचा अख्खा पगार जाळून टाकला होता. आणि त्यानंतर सलीम खान भाईजान सोबत जसे वागले होते तसं खूप कमी वेळा पालक वागत असावेत त्यांच्या मुलांशी.. (Salman Khan birthday..throwback story when he burnt father salim khan salary..)

सलमान खानचा जन्म मध्य प्रदेश मधील इन्दौरमध्ये झाला होता. कामाच्या निमित्तानं त्याचे वडील मुंबईला शिफ्ट झाले होते. मुंबईला पोहोचल्यावर सलीम खान यांना अनेकदा आर्थिक चणचण भासली. सलमानविषयीच्या एका पुस्तकात एक इंट्रेस्टिंग किस्सा शेअर करण्यात आला आहे, ज्यात त्यानं सलीम खान यांचा पगार जाळून टाकला होता याविषयी लिहिलं गेलं आहे.

हेही वाचा:जोखीममुक्त व्यवहारांसाठी रिझर्व बँकेचा 'डिजिटल रुपया'

दुपारची वेळ होती सलमान बादलीमध्ये काहीतरी जाळत बसला होता. मज्जा म्हणून तो जाळण्यासाठी आणखी कागद आणि पेपर शोधत होता. त्यानं पाहिलं की त्याच्या वडीलांनी काही कागद एके ठिकाणी जमा करून ठेवले आहेत. त्यानं ते कागद घेतले आणि जाळून टाकले. नंतर समोर आलं की सलमानने वडीलांचे ७५० रुपये जाळून टाकले होते.

आणि यावरनं त्यानं आईचा खूप मार आणि ओरडा खाल्ला होता. पूर्ण पगार जाळून टाकला होता म्हणून सलीम खाननी देखील थोडा राग व्यक्त केला, पण त्यावेळी सलीम खाननी योग्य काम केलं ते म्हणजे त्यांनी मुलाला मारण्यापेक्षा अधिक पैशाचं महत्त्व पटवून सांगितलं. आणि तेव्हा वडीलांनी शिकवलेली गोष्ट सलमान आजतागायत विसरला नाही.

ही गोष्ट आपल्या सगळ्यांनाच माहित आहे की सलमान खान बॉलीवूडच्या सगळ्यात श्रीमंत अभिनेत्यांपैकी एक आहे. आपल्या कमाईचा मोठा हिस्सा सलमान खान गरिबांना मदत करण्यासाठी खर्च करतो. कोरोना काळात जेव्हा लोकांकडे काम नव्हतं तेव्हा सलमाननं पुढे येऊन २५ हजार हून अधिक मोलमजूरी करणाऱ्यांना मदत केली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Covishield Vaccine : शरीरात रक्ताच्या गाठी होण्याचा धोका अन् हृदयासह मेंदूवर दुष्परिणाम; कोविशिल्ड लशीमुळे होणारा TTS काय आहे?

KL Rahul T20 WC 2024 : शुन्य दिवसांपासून... भारतीय संघाची घोषणा होताच लखनौने वगळलेल्या केएलसाठी केली पोस्ट

Pune Crime : सहा महिन्यांच्या बालकाची तीन लाखांत विक्री; बालकाचे अपहरण करणाऱ्या टोळीला कर्नाटकातून अटक

RTE Admission : आरटीईच्या प्रवेशाचे अर्ज भरण्यासाठी १० मे पर्यंत मुदतवाढ

LSG vs MI IPL 2024 Live : नेहलची झुंजार खेळी, टीम डेव्हिडची हाणामारी; मुंबईनं लखनौसमोर ठेवलं 145 धावांचे आव्हान

SCROLL FOR NEXT