Salman Khan body double
Salman Khan body double 
मनोरंजन

हुबेहूब सलमानच; बॉडी डबल परवेज काझीचे फोटो व्हायरल

प्रियांका कुलकर्णी

बॉलिवूडचा भाईजान अर्थात सलमान खानचा Salman Khan 'राधे : युअर मोस्ट वाँटेड भाई' Radhe Your Most Wanted Bhai हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. सध्या सोशल मीडियावर सलमानच्या बॉडी डबलची चर्चा सुरू आहे. सलमानचा बॉडी डबल परवेज काझी Parvez Kazi याने सोशल मीडियावर सलमानसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोला नेटकऱ्यांची पसंती मिळत आहे. राधे चित्रपटाच्या शूटिंगदरम्याच्या या फोटोमध्ये सलमान आणि परवेज एकसारखेच दिसत आहेत. (salman khan body double parvez kazi shares photo with actor on radhe your most wanted bhai)

या फोटोला परवेजने कॅप्शन दिले, 'राधे : युअर मोस्ट वाँटेड भाई' चित्रपटाच्या सेटवर समलान भाईंसोबत'. या फोटोवर सलमानच्या चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. या फोटोला एका नेटकऱ्याने कमेंट केली, ' दोन रत्न एकत्र'. 'दबंग 3', 'भारत', 'रेस 3' 'टाइगर जिंदा है', आणि 'प्रेम रतन धन पायो' या हिट चित्रपटांमध्ये परवेजने सलमानच्या बॉडी डबलचे काम केले आहे.

'राधे : युअर मोस्ट वाँटेड भाई' या चित्रपटामध्ये सलमान खानसोबत दिशा पाटनी, रणदीप हुड्डा, गौतम गुलाटी आणि जैकी श्रॉफ यांनी प्रमुख भूमिका केली आहे. लवकरच सलमान 'अंतिमः द फाइनल ट्रुथ' या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन महेश मांजरेकर हे करणार आहे. तसेच या चित्रपटात सलमान खानचा मेहुणा आयुष शर्मा देखील महत्वाची भूमिका करणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT