Salman Khan Bodyguard Salary esakal
मनोरंजन

Salman Khan Bodyguard Salary : सलमान साठी जीव द्यायला तयार असणाऱ्या शेराचा पगार किती? बॉडीगार्ड बनण्याआधी होता मिस्टर महाराष्ट्र

Salman Khan attacked : बऱ्याचदा बॉलीवूडचा भाईजान सलमान खान त्याच्यासोबत सतत सावलीसारखा असणाऱ्या शेराची गोष्ट अनेकांना माहिती नाही.

सकाळ डिजिटल टीम

Salman Khan Bollywood actor bodygaurd shera : बऱ्याचदा बॉलीवूडचा भाईजान सलमान खान त्याच्यासोबत सतत सावलीसारखा असणाऱ्या शेराची गोष्ट अनेकांना माहिती नाही. सलमानचा अंगरक्षक म्हणून शेरावर चित्रपटही आला होता. त्याला चाहत्यांचा मोठा प्रतिसादही मिळाला. सलमानवर भावासारखं प्रेम करणाऱ्या शेराचा प्रवास मोठा कष्टाचा होता. एका मुलाखतीमध्ये त्यानं त्याविषयी सांगितलं होतं.

सलमानचा बॉडीगार्ड शेरा हा आता एक मोठा सेलिब्रेटी झाला आहे. त्याचा सोशल मीडियावर हजारोंच्या संख्येनं चाहतावर्ग आहे. त्याला इंस्टावर फॉलो करणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. सलमानवर जेवढे चाहते प्रेम करतात तितकचं जास्त प्रेम त्याच्या बॉडीगार्डवर म्हणजे शेराला देखील त्यांच्याकडून मोठी पसंती मिळत असल्याचे दिसून आले आहे. शेराचं खरं नाव गुरमित सिंह जॉली असे आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सलमानचा सुरक्षारक्षक म्हणून शेराचा वर्षाला दोन कोटी रुपये घेतो.

Also Read - जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??

महिन्याला त्याला मिळणारा पगार हा १६ लाख रुपये आहे. शीख परिवारातून आलेल्या शेराची प्रकृती ही लहानपणापासूनच सुदृढ राहिली आहे. त्याची १९८७ साली ज्युनिअर मिस्टर मुंबई, त्याच्या पुढच्या वर्षी मिस्टर महाराष्ट्र म्हणून निवड झाली होती. त्यानंतर शेराच्या वडिलांनी त्याला मुंबईला बोलावून घेतले. तिथे तो गॅरेजमध्ये काम करत होता.

१९९५ मध्ये सोहेल खाननं सलमान खानच्या विदेशी दौऱ्यासाठी शेराच्या कंपनीकडे सुरक्षेसाठी मागणी केली होती. त्यानंतर सोहेलनं शेराला विचारलं होतं की, भाईची साथ कधीही सोडणार नाहीस ना? शेरानं संमती दिली होती. एकदा सलमानला एका शोमध्ये जायचे होते त्यावेळी सोहेलनं शेराला सांगितले. तेव्हापासून तो नेहमीच सलमानच्या अवती भवती राहत असल्याचे दिसून आले आहे.

सलमानला शेराचे काम आवडल्यानं त्यानं त्याला नेहमीच आपल्या सुरक्षारक्षकाचे काम दिले. आता तो त्यांच्या कुटूंबातीलच एक सदस्य आहे. शेरा हा एक सिक्योरिटी कंपनी देखील चालवतो. त्याचे नाव टायगर सिक्योरिटी असे आहे.

जी सेलिब्रेटींना सुरक्षा देण्याचे काम करते. एका मुलाखतीमध्ये शेरानं सांगितले होते की, सलमान हा माझ्यासाठी खूप काही आहे. त्याच्यासाठी जीव द्यायलाही तयार होईल. त्यानं माझ्यावर खूप प्रेम केले आहे. भरभरून दिले आहे. वीस वर्षांपासून मी त्याला ओळखतो आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup 2025: पाकिस्तानचं हे अती झालं! म्हणतात 'हस्तांदोलन' प्रकरणावर कारवाई करा अन्यथा UAE च्या लढतीवर बहिष्कार टाकतो...

Latest Marathi News Updates : भारतात प्रवेश करणाऱ्या 79 कैद्यांना अटक

खूपच इमोशनल... प्रेक्षकांना कसा वाटला 'लपंडाव' मालिकेचा पहिला भाग? नेटकरी म्हणतात- रुपालीऐवजी दुसरी कुणी...

Crime: अनैसर्गिक कृत्य! २ तरुणांच्या गुप्तांगावर २३ वेळा स्टेपल अन् मिरचीचा स्प्रे...; जोडप्याचा कारनामा, भयंकर कारण समोर

Crime News : नाशिकमधील बेकायदा कॉल सेंटरवर सीबीआयची धाड; यूकेतील नागरिकांना गंडा

SCROLL FOR NEXT