Salman Khan Bollywood Actor production house esakal
मनोरंजन

Salman Khan News: सलमान खानच्या प्रॉडक्शन हाऊसमध्ये होतेय 'फेक कास्टिंग'? 'SKF' कडून आलं मोठं स्पष्टीकरण!

बॉलीवूडचा भाईजान सलमान खान हा नेहमीच त्याच्या वेगवेगळ्या स्टाईल आणि वक्तव्यांसाठी ओळखला जाणारा सेलिब्रेटी आहे.

युगंधर ताजणे, सकाळ ऑनलाईन टीम

Salman Khan Bollywood Actor production house : बॉलीवूडचा भाईजान सलमान खान हा नेहमीच त्याच्या वेगवेगळ्या स्टाईल आणि वक्तव्यांसाठी ओळखला जाणारा सेलिब्रेटी आहे. आगामी काळात भाईजानचे वेगवेगळ्या विषयांवरील चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या सगळ्यात सलमानची प्रॉडक्शन कंपनी चर्चेत आली आहे. त्या कंपनीला काही महत्वाचे खुलासे करावे लागले आहेत.

सलमान खानच्या प्रॉडक्शन कंपनीनं ट्विट करत आपल्या कंपनीविषयी जे काही वेगवेगळ्या प्रकारच्या अफवा व्हायरल होत आहे त्यावर स्पष्टीकरण दिले आहे. त्यांनी म्हटले आहे की, आमच्या कंपनीकडून कोणत्याही प्रकारचे कास्टिंग केले जात नाही. त्यामुळे आमचे नाव घेऊन जर तुमच्याकडे कोणते मेल्स किंवा फोन आले आणि त्याचा विषय जर कास्टिंगच्या संदर्भात असेल तर त्याला उत्तर देऊ नका.

याशिवाय टीमनं असे देखील म्हटले आहे की, जर सलमान खानचे नाव घेऊन कुणी कोणत्याही प्रकारची बदनामी करत असेल तर त्याच्यावर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल. सलमानच्या प्रॉडक्शन हाऊसच्या वतीनं बॉलीवूडमधील अनेक सेलिब्रेटींना ऑडिशन, कास्टिंगचे फेक मेसेज गेल्याचे दिसून आले आहे. यामुळे वेगळ्याच चर्चेला उधाण आल्यानं कंपनीला खुलासा करावा लागला आहे.

प्रॉडक्शन हाऊसकडून कोणत्याही प्रकारे कास्टिंग केले जात नाही. त्यामुळे कुणीही त्यावरील बातम्या, मेसेज यावर विश्वास ठेवू नये. ज्यांनी कुणी हे फेक मेसेज व्हायरल केले आहेत त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे त्या पोस्टमधून सांगण्यात आले आहे. यापूर्वी देखील सलमानच्या कंपनीला अशा प्रकारच्या परिस्थितीचा सामना करावा लागला होता.

सलमान खानच्या वर्कफ्रंटविषयी बोलायचे झाल्यास त्याचा शेवटचा चित्रपट टायगर ३ होता. त्यामध्ये तो कतरिना कैफनं महत्वाची भूमिका साकारली होती. यानंतर तो लवकरच करण जोहर सोबत एका मोठ्या प्रोजेक्टची घोषणा करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. ही एक अॅक्शन फिल्म असून त्याचे दिग्दर्शन विष्णुवर्धन करणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sugar industry: साखर कोणी खाईना, खपात घसरण; मार्चचा ५० टक्के कोटा पडून; एप्रिलमध्येही विक्रीचे ‘चॅलेंज’, उद्योगासमोर दुहेरी संकट!

Vidarbha News:शासकीय कार्यालये की मृत्यूचे सापळे? ; ९५ टक्के इमारती धोकादायक; कर्मचाऱ्यांच्या जीवाशी खेळ

Vidarbha News: रस्त्यांची दयनीय स्थिती; विकासकामांसाठी प्रतीक्षाच; हलबीटोला मार्गासह मुख्य रस्ते जीर्ण; अपघाताचा धोका वाढला

Amravati News: सेंट्रल बँकेत तीन कोटींचा अपहार; न केलेल्या कामाचे देयके काढून पैसा खिशात

Kolhapur Crime : कोल्हापूर हादरलं! दोन एकर जमिनीसाठी सख्ख्या भावासह वडिलांचा कुऱ्हाड-खोऱ्याने खून; हिंगणगावात विहिरीशेजारी नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT