Salman Khan Bollywood Bhaijaan 80 Crore farmhouse
Salman Khan Bollywood Bhaijaan 80 Crore farmhouse  
मनोरंजन

Salman Khan : सलमान खानचं ८० कोटींचं फार्महाऊस, त्यात तर...

युगंधर ताजणे

Salman Khan Bollywood Bhaijaan 80 Crore farmhouse : बॉलीवूडचा भाईजान सलमान खान हा नेहमीच त्याच्या वेगळेपणासाठी प्रसिद्ध असणारा सेलिब्रेटी आहे. त्याच्या हटकेपणाची चर्चा होत असते. किसी का भाई आणि किसी जान चित्रपटामुळे सलमान हा लाईमलाईटमध्ये आहे. मात्र आणखी एका कारणामुळे त्यानं लक्ष वेधून घेतले आहे.

मुंबईपासून जवळच असलेल्या पनवेल याठिकाणी सलमानचे अलिशान फार्म हाऊस आहे. सलमानचा निवांत वेळ व्यतीत करण्याचे सर्वोत्तम ठिकाण म्हणजे त्याचे हे अलिशान फार्म हाऊस असे सांगितले जाते. सलमानचे हे फार्म हाऊस ८० कोटींचे असल्याचे बोलले जाते. निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या या फार्म हाऊस विषयी चाहत्यांना नेहमीच कुतूहलही राहिले आहे.

Also Read - Fatty Liver Disease: संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

२०२० मध्ये सलमानं त्याच्या मुंबईमधील घरातून फार्म हाऊसकडे धाव घेतली होती. कोरोनाच्या काळात तो त्या फार्म हाऊसवर बराच काळ होता. पनवेलमध्ये असणारं सलमानचे ते फार्म हाऊस नेहमीच सोशल मीडियावर चर्चेचा भाग राहिला आहे. सलमाननं देखील त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवरुन त्या फार्म हाऊसचे फोटो शेयर करुन नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

सलमान त्या फार्म हाऊसवर शेती करत असल्याचे, प्राण्यांसोबत खेळत असल्याचे, जीम करतानाचे फोटो व्हायरल झाले होते. सलमान शेतात काम करतो आहे हे फोटो चाहत्यांना कमालीचे आवडले होते. त्यावरुन त्याच्यावर नेटकऱ्यांनी कौतूकाचा वर्षाव केला होता.

सलमान आणि त्याचं प्राणीप्रेम हे कधीही लपून राहीलेलं नाही. त्यानं त्याच्या फार्महाऊसवर देखील पाळीव प्राणी ठेवले आहेत. त्यात घोडा, कुत्रा यांचा समावेश आहे. सलमान जेव्हा फार्म हाऊसवर जातो तेव्हा त्यांच्यासोबत वेळ व्यतीत करत असल्याचे दिसून आले आहे. त्यांच्यासोबतचे काही फोटो आणि व्हिडिओ देखील मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले असून त्याला नेटकऱ्यांचा मिळालेला प्रतिसाद मोठा आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis : तिथं जा नाश्ता वगैरे करा अन्... उद्धव ठाकरेंच्या भेटीपूर्वी अमित शाहांना फडणवीस काय म्हणाले होते?

Indian Economy: भारताच्या अर्थव्यवस्थेसाठी आनंदाची बातमी! UNने 2024 साठी जीडीपी वाढीचा अंदाज वाढवला

Jalgaon News : दूषित पाण्याच्या नमुन्यांमध्ये लक्षणीय घट; डेंग्यूबाबत आरोग्य यंत्रणेच्या उपाययोजनांना यश

Latest Marathi News Live Update : धक्कादायक! पुण्यात कोयत्याने सपासप करुन तरुणाचा टोळक्याकडून खून

परदेशात पळून गेलेला खासदार भारतात आलाच नाही; आता 'रेड कॉर्नर नोटीस' बजावणे हाच एकमेव मार्ग शिल्लक!

SCROLL FOR NEXT