Salman Khan esakal
मनोरंजन

Salman Khan: तो साठीच्या जवळ, बॉलिवूडमधली 'ती' तिशीतली! 'डेटिंग' सुरु...

सलमानच्या गर्लफ्रेंडच्या नावाची यादी मोठी आहे. आता त्यात आणखी एका नव्या नावाची भर पडली आहे.

सकाळ डिजिटल टीम

Salman Khan Bollywood Bhaijan now reletionship: बॉलीवूडचा भाईजान सलमान खान याच्याविषयी जेवढं काही बोलावं तेवढं कमी आहे. तो नेहमीच स्वताला वेगवेगळ्या कारणामुळे चर्चेत ठेवतो. गेल्या अनेक वर्षांपासून तो बिग बॉस या लोकप्रिय रियॅलिटी शो चा होस्ट आहे. त्यानं त्याच्या आक्रमक स्वभावामुळे त्या शो ची लोकप्रियता टिकवून ठेवली आहे.

आता सलमान एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. तसा तो त्याच्या सह अभिनेत्रींमुळे चाहत्यांच्या चर्चेचा विषय असतोही. बॉलीवूडमध्ये सध्या ज्या टॉपच्या अभिनेत्री आहेत त्यांना ब्रेक देण्यात सलमानचा मोठा वाटा असल्याचे दिसून येते. बऱ्याचशा अभिनेत्रींना सलमानमुळे एकतर त्याच्या चित्रपटात किंवा दुसऱ्या एका दिग्दर्शकाच्या चित्रपटामध्ये डेब्यु करण्याची संधी मिळाल्याचे दिसून आले आहे.

हेही वाचा - Digital Rupee India : देशाचे नवे पर्यायी चलन ‘डिजिटल रुपी’

दीया मिर्झा, प्रीती झिंटा, राणी मुखर्जी, झरीन खान, सुश्मिता सेन, डेजी शाह, कतरिना कैफ, जॅकलीन फर्नांडिझ, दिशा पटानी याशिवाय अनेक अभिनेत्रींना सलमाननं त्याच्या चित्रपटामध्ये काम करण्याची संधी दिली होती. यातील बहुतांशी अभिनेत्रींना त्यानं पहिल्यांदाच आपल्या चित्रपटातून समोर येण्यासही त्यानं वाव दिला. यासगळ्यात आणखी एका अभिनेत्रीचं नाव पुढे आलं आहे. त्यामुळे सलमान हा सोशल मीडियावर चर्चेतही आला आहे.

सलमाननं आता ज्या अभिनेत्रीला आपल्या चित्रपटामध्ये ब्रेक दिला आहे त्या अभिनेत्रीचे नाव आहे पुजा हेगडे. ती टॉलीवूडची लोकप्रिय अभिनेत्री आहे. मात्र बॉलीवूडमधील अनेक चित्रपटांमध्ये तिनं चमकदार भूमिका केल्या आहेत. आपल्यापेक्षा वयानं २४ वर्षांहून लहान असणाऱ्या अभिनेत्रीच्या प्रेमात भाईजान पडल्यानं त्याच्यावर नेटकऱ्यांनी कौतूकाचा वर्षाव केला आहे दुसरीकडे त्याला ट्रोलही केले आहे.

उमैर संधूच्या एका व्टिटनं सध्या सोशल मीडियावर वेगळ्याच चर्चेला उधाण आले आहे. त्यात उमैरनं असं म्हटलं आहे की, सलमान आणि पुजा हेगडे हे रिलेशनशिपमध्ये आहेत. ब्रेकिंग न्युज, सलमान आणि पुजा हेगडे हे बॉलीवूडचे नवीन कपल असल्याचे संधुचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे सलमानच्या जवळच्या व्यक्तींनी देखील या गोष्टीवर शिक्कामोर्तब केल्याचे म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Explainer: फडणवीस आणि शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका; पण राज ठाकरेंसाठी 'मवाळ भूमिका', नेमकं समीकरण काय? वाचा सोप्या शब्दात

IND vs ENG 2nd Test: २६९, १००* ! शुभमन गिलचे शतक अन् ५४ वर्षांपूर्वीचा विक्रम उद्ध्वस्त; एकाही भारतीयाला नव्हता जमला हा पराक्रम

SBI Bank Manager Viral Video : ''तुला iPhone देईन, शारीरिक संबंध ठेव..’’ म्हणत, महिला कर्मचारीशी घृणास्पद कृत्य करणाऱ्या SBI व्यवस्थापकाचा भांडोफोड!

Yavatmal News: लाखो विद्यार्थ्यांचा खडतर प्रवास! शिक्षणासाठी खेड्यातून ‘अप-डाऊन’, सवलतीच्या पासचा दिलासा पण...

Pune Crime : ४० दिवसांच्या मुलीची साडेतीन लाखांत विक्री; आई-वडिलांसह सहा जणांना अटक

SCROLL FOR NEXT