Salman-Khan 
मनोरंजन

‘भाईजान’ने पनवेलमधील बर्थडे पार्टी केली कॅन्सल; कारण...

सकाळ डिजिटल टीम

बॉलिवूडचा 'दबंग स्टार' सलमान खानचा वाढदिवस 27 डिसेंबरला दरवर्षी मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो. सलमानचे चाहते त्याच्या वाढदिवसाची आतुरतेने वाट पाहत असतात. यंदा त्याचा 54वा वाढदिवस तो कुठे साजरा करतो? याकडे सर्वांचे लक्ष्य लागले असताना आता सलमान त्याचा बर्थडे मुंबईत साजरा करणार नसल्याची बातमी समोर येत आहे. 

दरवर्षी सलमान त्याचा वाढदिवस पनवेलमधील फार्म हाऊसवर साजरा करतो. यानिमित्ताने जंगी पार्टीचे आयोजन केले जाते. अख्ख्या बॉलिवूडमधील स्टार मंडळी या पार्टीला हजेरी लावतात. मात्र, यंदा ही पार्टी होण्याची शक्यता कमी आहे. पिंकव्हिलाने दिलेल्या माहितीनुसार, सलमान त्याचा वाढदिवस त्याचा भाऊ सोहेलच्या वांद्रे येथील घरी साजरा करणार आहे. त्याला कारण ठरलीय ती त्याची बहीण अर्पिता.

सलमानची बहिण अर्पिता ही दुसऱ्यांदा प्रेग्नंट आहे. त्यामुळे आपल्या लाडक्या बहिणीसाठी सलमानने त्याची बर्थडे पार्टी कॅन्सल केली आहे. अर्पिता सलमानच्या वाढदिवशीच बाळाला जन्म देईल, अशी शक्यता असल्याने सलमानने बहिणीजवळ राहण्याचा निर्णय घेतला आहे. घरी नवा पाहुणा येणार असल्याने खान कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे. 

मात्र, या घरगुती सेलिब्रेशनसाठी बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खान, डेव्हिड धवन, कबीर खान, दबंग-3 ची पूर्ण टीम, प्रभुदेवा, सई मांजरेकर, सोनाक्षी सिन्हा, कॅटरिना कैफ, जॅकलिन फर्नांडिस आणि सलमानचे निकटवर्तीय पाहुणे हजर राहण्याची शक्यता आहे.

18 नोव्हेंबर 2014 मध्ये अर्पिताने तिचा बॉयफ्रेंड आयुष शर्मासोबत लग्न केले. आयुष हा हिमाचल प्रदेशमधील एका नावाजलेल्या राजकीय कुटुंबातील असून आयुष आणि अर्पिताला आहिल नावाचा एक मुलगाही आहे.

सलमान त्याच्या भाच्याला खेळवत असल्याचे फोटो सोशल मीडियावर अनेकवेळा व्हायरल झाले आहेत. आता पुन्हा एकदा सलमान मामा होणार आहे. त्यामुळे त्याने आपली बर्थडे पार्टी कॅन्सल केली आहे. कदाचित बॉलिवूडला त्याच्या बर्थडेची आणि पुन्हा एकदा मामा झाल्याची जोरदार पार्टी मिळू शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US Israel Iran War : इराणकडून सुरक्षा प्रमुखाच्या मृत्यूची कबुली, अमेरिकेचा होर्मुझजवळील क्षेपणास्त्र तळावर सर्वात शक्तिशाली बॉम्बने हल्ला

Palghar Bribery case: पालघरमध्ये आरोग्य अधिकारी 'लाचलुचपत'च्या जाळ्यात; वैद्यकीय क्षेत्रात खळबळ, 35 हजार स्विकारत हाेते अन् काय घडलं!

Dharshiv Hailstorm News: लातूर-धाराशिवमध्ये गारपीटीचा कहर; शेती पिकांसह फळबागांचे मोठे नुकसान; अवकाळी पावसाचा तडाखा!

Malkapur Accident: कंटेनरखाली चिरडल्याने दुचाकीस्वार ठार; मलकापूरजवळ अपघात, कंटेनरच्या वेगानं हाेत्याचं नव्हतं झालं!

शिक्षकांची नाही यंदा उन्हाळ्याची सुट्टी! एप्रिलअखेर जनगणनेचे प्रशिक्षण अन्‌ १६ मे ते १४ जूनपर्यंत करावी लागणार घरगणना, विशेष रजा मिळणार, वाचा...

SCROLL FOR NEXT