Salman Khan's Dabangg 3 actress Hema Sharma Says She Was Humiliated And 'Thrown Out Like A Dog' sakal
मनोरंजन

मला कुत्र्यासारखं वागवलं गेलं... 'दबंग ३' मधील अभिनेत्रीचा सलमान खानच्या सुरक्षा रक्षकांवर गंभीर आरोप

अभिनेत्री हेमा शर्माचा व्हिडिओ व्हायरल..

नीलेश अडसूळ

Dabangg 3 actress Hema Sharma: सध्या बॉलिवूडचा भाइजान अभिनेता सलमान खानच्या दबंग ३ या चित्रपटाची सगळेच प्रतीक्षा करत आहे. या चित्रपटाची बरीच चर्चा आहे. अशातच या चित्रपटाच्या सेटवरून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.,

याच बंग ३ मधील अभिनेत्रीने सलमान खानच्या रक्षकांवर गंभीर आरोप केले आहेत. या सुरक्षा रक्षकांनी अभिनेत्रीला मानहानीजनक वागणूक दिल्याचे तिचे म्हणणे आहे. सध्या या प्रकरणाची चर्चा सुरु आहे.

(Salman Khan's Dabangg 3 actress Hema Sharma Says She Was Humiliated And 'Thrown Out Like A Dog')

हेमा शर्मा असे या अभिनेत्रीचे नाव असून, तिने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत याबाबतचा खुलासा केला आहे. यावेळी हेमा म्हणाली की, 'मला सलमान खान यांच्या 'दबंग 3' मध्ये काम करायचे होते. या चित्रपटात काम करण्यासाठी जे-जे शक्य आहे ते सर्वकाही केले कारण मला सलमान सरांना भेटायचे होते. माझा पहिला सीन सलमान सरांबरोबर होता. त्यामुळे या संधीचा मला खूप आनंद झाला.'

'मात्र, तो सीन सलमान खानशिवाय शूट करण्यात आला. त्यामुळे माझी खूप निराशा झाली. म्हणून शूट संपल्यानंतर सलमान खान यांना केवळ एकदा भेटता यावं यासाठी मी अनेकांशी बोलले. जवळपास ५० लोकांना मी विनंती केली.'

पुढे हेमा शर्मा म्हणाली, 'यानंतर मी पंडित जनार्दन यांची भेट घेतली आणि सलमान सरांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली. त्यांनी मला आश्वासन दिले आणि आम्ही सलमान सरांना भेटायला गेलो. पण त्यावेळी मला इतकी वाईट वागणूक मिळाली हे ते मी सांगू शकत नाही'

'माझा अपमान करत मला कुत्र्यासारखे बाहेर हाकलले गेले. मला सलमानसोबत फक्त एक फोटो काढायचा होता. पण त्यांनी १०० लोकांसमोर माझा अपमान केला. हे घडले तेव्हा माझ्या ओळखीचे अनेकजन माझ्या आजूबाजूला होते'

'त्यामुळे हा अपमान इतका जिव्हारी लागला की, मी १० दिवस झोपू शकले नाही. सलमान खान तिथे उपस्थित नव्हते, पण ते आजूबाजूलाच होते, त्यांच्या मनात आले असते तर त्यांनी हस्तक्षेप करत याची दखल घेतली असती पण त्यांनी तसे केले नाही. यापुढे मी सलमान खान सरांना कधीही भेटणार नाही,'अशा शब्दात तिने नाराजी व्यक्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Monsoon Rain : राज्यात पावसाचा कहर ! मुसळधार पावसाने मुंबई ठप्प, पुण्यात जनजीवन विस्कळीत; मध्य महाराष्ट्र-विदर्भात अलर्ट जारी

Pune Crime: 'Sorry Mummy' मेसेजनंतर खळबळ! 'ज्युस घेऊन येते' म्हणत घराबाहेर पडलेली अल्पवयीन बेपत्ता; चुलत भावावर गुन्हा

Konkan Nuclear project: कोकणात अणुऊर्जा प्रकल्पाचे संकेत! राज्य सरकारचे विधानसभेत स्पष्टीकरण; नेमका प्रकल्प कुठे उभारणार?

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Latest Marathi News Live Update : श्रीवर्धन मधील बोर्ली पंचतन परिसरात एसटीला अपघात

SCROLL FOR NEXT