Salman Khan Death Threat Kangana Ranaut Reaction 
मनोरंजन

Kangana Ranaut : 'घाबरतोस कशाला, मोदी आहेत ना?'

बॉलीवूडचा भाईजान सलमान खाननं आपल्याला आता मुंबईपेक्षा दुबई जास्त जवळची वाटू लागली आहे.

युगंधर ताजणे

Salman Khan Death Threat Kangana Ranaut Reaction : बॉलीवूडचा भाईजान सलमान खाननं आपल्याला आता मुंबईपेक्षा दुबई जास्त जवळची वाटू लागली आहे. असे वक्तव्य एका मुलाखतीमध्ये केले आणि वेगळ्याच चर्चेला सुरुवात झाली. सोशल मीडियावर तर सलमाननच्या त्या वक्तव्यावर नेटकऱ्यांनी त्याच्यावर जोरदार टीका केली आहे. यासगळ्यात बॉलीवूडची क्वीन कंगनानं सलमानची समजूत घातली आहे.

बॉलीवूडमध्ये काहीही झालं तरी त्यावर आपली प्रतिक्रिया आलीच पाहिजे, असा होरा कंगनाचा असतो. तिच्या वाचाळपणामुळेच की काय ट्विटरनं तिचं अकाउंट काढून टाकलं होतं. दिल्लीत जे शेतकऱ्यांचे आंदोलन झाले होते, त्यात कंगनानं दिलेली प्रतिक्रिया भलतीच तिखट होती. धार्मिक तेढ निर्माण करण्याचे काम तिनं केलं होतं. यामुळेच की काय कंगनाला त्याचा फटका बसला होता.

Also Read - Fatty Liver Disease: संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

आता कंगनाचे ट्विटर सुरु झाले आहे. कंगनानं सलमानविषयी यापूर्वी देखील वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. बॉलीवूडमाफिया म्हणून कंगना ज्यांच्या नावांचा उल्लेख करते त्यात सलमानचे नावही तिनं घेतले आहे. अशातच काही दिवसांपासून सलमानला मिळत असलेल्या जीवे मारण्याच्या धमक्यांनी चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

मुंबई पोलिसांकडून सलमानला वाय दर्जाची सुरक्षा मिळाली आहे. सलमान खानच्या घराबाहेर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त आहे. अशातच आप की अदालत या कार्यक्रमामध्ये सलमाननं दिलेली प्रतिक्रिया नेटकऱ्यांच्या चर्चेचा विषय ठरताना दिसत आहे. मी जिकडे जातो तिथे माझ्यासोबत पोलीस असतात. खरंतर मला पोलीस संरक्षणाची गरजही नाही. जे कुणी मला धमकी देत आहेत त्यांना मी ओळखतही नाही. असे त्यानं म्हटले होते.

यासगळ्यात सलमानच्या सात्वंनासाठी कंगना धावून आली आहे. एऱवी सलमानवर टीका करण्याची एकही संधी न सोडणाऱ्या कंगनानं सलमानप्रती काळजी व्यक्त केली आहे. कंगना तिच्या एका पोस्टमध्ये म्हणते की, सलमान तू का विनाकारण काळजी करतो आहेस, तू अजिबात घाबरू नकोस. मोदी असल्यावर तुला काळजी करण्याची गरज नाही.

कंगना म्हणते, आम्ही कलाकार आहोत. आमच्यातीलच एक कलाकार सलमान खानला आता केंद्र सरकारकडून सुरक्षा दिली गेली आहे. सलमानला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्याकडूनही सुरक्षा दिली गेली आहे. त्यामुळे त्यानं घाबरु नये.त्याला काहीही होणार नाही. आता देश सुरक्षित लोकांच्या हातात आहे. असे कंगनानं म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lalbaugcha Raja: हिंदु-मुस्लिम ऐक्याचा संदेश! लालबागचा राजा मशिदीजवळ पोहोचतो तेव्हा...; पाहा ऐतिहासिक क्षणाचा खास व्हिडिओ

Ganpati Visarjan 2025 Live Updates : लालबागचा राजा गिरगाव चौपाटीच्या दिशेने पुढे जातोय

उत्साहाला गालबोट! पुण्यात ४ तर शहापूरमध्ये ५ जणांचा मृत्यू, कोल्हापूरसह सांगलीत मिरवणुकीत वाद... विसर्जनादरम्यान कुठं काय घडलं?

Crime: मित्रासाठी सापळा रचला, पण स्वत:च अडकला; आरडीएक्ससह दहशतवादी हल्ला करणार असल्याचा कॉल तरुणाने का केला? सत्य समोर

Ohh Shit... टीम इंडियाचा फॉर्मात असलेला फलंदाज लंगडताना दिसला, तंदुरुस्तीवर प्रश्नचिन्ह! Asia Cup पूर्वी वाढली डोकेदुखी

SCROLL FOR NEXT