मुंबई- लॉकडाऊनमुळे अभिनेता सलमान खान वडिल सलीम खान सोडले तर संपूर्ण कुटूंबासोबत पनवेल येथील फार्महाऊसवर अडकला आहे.. सलमान अनेकवेळा वेगवेगळ्या प्रकारे कोरोना संकटाशी सामना करण्यासाठी आत्तापर्यंत पुढे आला आहे. आणि आता पुन्हा एकदा त्याने जॅकलीन आणि युलिया यांच्या साथीने गरजुंना मदत केली आहे. याचा व्हिडिओ स्वतः सलमानने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करत याविषयी माहिती दिली आहे.
सलमान खान पनवेलच्या फार्महाऊसवर अडकल्यापासून अनेकदा तिथूनंच व्हिडिओ शेअर करत लोकांना घरात राहण्यांच आवाहन करताना दिसला आहे. इतकंच नाही तर त्याने प्यार करोना हे गाणं देखील सादर केलं होतं. हे गाणं सलमान आणि हुसैन दलाल यांनी मिळून लिहिलं होतं. तर संगीत साजिद-वाजिद यांचं होतं.
सलमान खानने आता त्याच्या याच फार्महाऊसवरचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये सलमान खान त्याच्या कुटुंबातील सदस्यांसोबत एकत्र येऊन एका स्टोअर रुममधून किराणा आणि खाण्या-पिण्याच्या आवश्यक गोष्टी समोर असलेल्या बैलगाडीमध्ये चढवण्यासाठी मदत करत आहेत. हे सामान जास्त असल्याने कुटुंबातील सर्व सदस्यांनी याला हातभार लावत एक प्रकारची मानवी साखळी तयार करुन हे सामान बैलगाडीमध्ये ठेवत आहेत.
या व्हिडिओमध्ये तीन बैलगाड्या, एक ट्रॅक्टर आणि २ गाड्या आपल्याला सामान भरुन नेताना शेवटला दिसून येत आहेत.. सलमानने पनवेल येथील या फार्महाऊसच्या आसपासच्या गावांसाठी किराणा आणि गरजेच्या वस्तु देऊन मदतीचा हात पुढे केला आहे.
या व्हिडिओमध्ये सलमान खानच्या कुटंबातील सदस्यांव्यतिरिक्त त्याची चर्चित गर्लफ्रेंड युलिया वंतुर आणि अभिनेत्री तसंच सलमान खानची खास मैत्रीण जॅकलीन फर्नांडिस देखील दिसून येत आहे.
salman khan distributes ration to needy villagers along with iulia vantur and jacqueline fernandez
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.