salman khan grand entry in bigg boss 17 house first look photo and video viral SAKAL
मनोरंजन

Bigg Boss 17 Salman Khan: बिग बॉसच्या घराला रेल्वे इंजिनची साथ! सलमानची नवीन पर्वात ग्रँड एन्ट्री

सलमान खानचा बिग बॉस 17 मधला पहिला लूक समोर आलाय

Devendra Jadhav

Bigg Boss 17 Salman Khan News: सलमान खान हा बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेता. सलमान खान लवकरच बिग बॉस 17 चं सूत्रसंचालन करताना दिसणार आहे. सलमान खानने बिग बॉस OTT चा दुसरा सीझन गाजवला. आता बिग बॉस 17 च्या निमित्ताने सलमान पुन्हा एकदा सूत्रसंचालकाच्या भूमिकेत दिसणार आहे.

सलमान खानचा बिग बॉस 17 मधला पहिला लूक समोर आलाय. सलमान नवीन पर्वात एकदम हटके आणि डॅशिंग अवतारात दिसतोय.

(salman khan grand entry in bigg boss 17)

सलमान खानचा बिग बॉस 17 मधला नवीन लूक

सलमान खानचा बिग बॉसमधील पहिला लूक समोर आलाय. यात सलमान ब्लॅक टीशर्ट आणि लाल रंगाच्या जॅकेटमध्ये एकदम डॅशिंग अंदाजात दिसतोय.

सलमान खानच्या या नवीन लूकमध्ये बिग बॉसचा भव्यदिव्य सेटही दिसत आहे. या सेटमध्ये एक खास गोष्ट दिसतोय. ते म्हणजे यंदा बिग बॉस 17 मध्ये रेल्वे इंजिन पाहायला मिळतंय. या सेटवर सलमाने खास फोटोशूट केलेलं दिसतंय.

बिग बॉस 17 च्या घराला रेल्वे इंजिनची साथ

पापाराझी विरल भयानीने शेअर केलेल्या फोटोंमध्ये, बिग बॉस 17 च्या स्टेजवर अनेक प्रॉप्स आहेत जे वीकेंड का वार भागांमध्ये दिसू शकतात.

सलमानने एका बोगद्यातून धडाकेबाज एंट्री केली ज्यामध्ये सेंटर स्टेजला एक ड्रॅगन सेट केला होता. जुन्या व्हिक्टोरियन काळापासून प्रेरित वाटणाऱ्या भिंतीसमोर सलमान उभा असलेला दिसतोय. बिग बॉस 17 च्या सेटवर भव्यदिव्य रेल्वे इंजिन बसवल्याचा खुलासाही त्यांनी केला. ओमंग कुमार यांनी हा भव्य सेट डिझाईन केला आहे.

कधी सुरु होणार बिग बॉस 17?

5 ऑक्टोबरपासून बिग बॉस 17 सुरू होणार आहे, हा सीझन जिओ सिनेमा आणि कलर्स टीव्हीवर सोमवार ते शुक्रवार रात्री 10 वाजता आणि शनिवार ते रविवार रात्री 9 वाजता पाहता येईल. यावेळी, टीव्ही कपल व्यतिरिक्त, ओटीटी, यूट्यूबर्सची सुद्धा या शोमध्ये सहभागी असतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Local Body Election: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मतदानाआधीच भाजपचा दबदबा; १०० उमेदवारांची बिनविरोध निवड

Pune RTO : नवले पूल अपघातानंतर आरटीओ ॲक्शन मोडवर! २० चालकांच्या डोळ्यांत दोष, कायमस्वरूपी तपासणी केंद्राची मागणी

Latest Marathi News Live Update: दिल्लीला पुन्हा स्मॉगचा विळखा! AQI 429, ‘Severe’ श्रेणीत शहर ठप्प

India VS South Africa: वनडे मालिकेसाठी रिषभ पंत, राहुल कर्णधारपदाच्या शर्यतीत; शुभमन गिल तंदुरुस्त होण्याची शक्यता फारच कमी

Maharashtra Weather Alert : महाराष्ट्रावर पुन्हा पावसाचे संकट, थंडीची लाट ओसरली; हवामान विभागाचा अंदाज

SCROLL FOR NEXT