Salman Khan Health Update, Actor resume start shooting from 25th October Google
मनोरंजन

Salman Khan: डेंग्यू झाल्यानंतर कसा आहे सलमान? कधी होणार कामावर रुजू? समोर आली अपडेट

सलमान खान बिग बॉस १६ च्या 'वीकेन्ड का वार' मध्ये या शुक्रवारी दिसला नाही तेव्हा जोरदार चर्चा रंगली आणि त्यानंतरच त्याला डेंग्यू झाल्याचं समोर आलं.

प्रणाली मोरे

Salman Khan: बिग बॉस १६ मध्ये यावेळी 'वीकेन्ड का वार' शुक्रवार आणि शनिवारी ठेवण्यात आला आहे. गेल्या दोन आठवड्यात सलमान खाननं या दोन्ही दिवशी घरातल्या सदस्यांची धुलाई केलेली नजरेस पडली होती. पण यावेळी शुक्रवारी 'वीकेन्ड का वार' झालंच नाही. यामुळे भाईजान दिसला नसल्याने चाहते टेन्शनमध्ये आले होते. नंतर बातमी वाऱ्यासारखी पसरली की सलमानला डेंग्यू झाला असल्यानं तो आजारी आहे. आणि या कारणामुळे सलमानच्या सगळयाच शूटिंग धडाधड कॅन्सल करण्यात आल्या आहेत. या बातमीनं आता सलमानते चाहते टेन्शनमध्ये आलेयत.(Salman Khan Health Update, Actor resume start shooting from 25th October)

आपला लाडका अभिनेता लवकरात लवकर बरा व्हावा म्हणून चाहते प्रार्थना करत आहेत. आता देवानं चाहत्यांची प्रार्थना ऐकली आहे असं वाटत आहे कारण सलमानची हेल्थ अपडेट समोर आली आहे जी ऐकल्यावर चाहते सुखावतील असं दिसत आहे. यावरनं सलमान कामावर कधीपर्यंत परतेल हे देखील कळालं आहे.

एका इंग्रजी वेब पोर्टलला मिळालेल्या माहितीनुसार सलमान खानच्या प्रकृतीत सुधारणा होताना दिसत आहे. त्यामुळे बरं झाल्यावर तो लगेचच 'किसी का भाई,किसी की जान' या त्याच्या सिनेमाच्या शूटिंगला लवकरच सुरुवात करेल. २५ ऑक्टोबरपासून तो शूटिंगच्या सेटवर हजर राहणार असल्याचं कळत आहे. एवढंच नाही तर प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यानं सगळ्याच दिवाळी पार्टीपासून स्वतःला लांब ठेवल्याचं बोललं जात आहे. सध्या तो आपल्या घरात आराम करत असल्याचं जवळच्या सूत्रांनी सांगितलं आहे.

रिपोर्टनुसार कळत आहे की,'किसी का भाई किसी की जान' सिनेमाच्या शूटिंगसाठी मोठा सेट लावला आहे त्यामुळे सलमानला हे शूट लवकरच पूर्ण करायचे आहे. आपल्यामुळे कोणाचं नुकसान होऊ नये यासाठी तो स्वतःची अधिक काळजी घेऊन लवकर बरं होण्याचा प्रयत्न करत असल्याचं जवळच्या सूत्रांनी म्हटलं आहे.

सध्या सलमान त्याच्या दोन सिनेमांमुळे भलताच चर्चेत आहे. एक 'टायगर ३' तर दुसरा 'किसी का भाई,किसी की जान'. 'टायगर ३' ची रिलीज डेट बदलल्याचं सलमाननं स्वतः काही दिवसांपूर्वी पोस्ट करत सांगितलं होतं. हा सिनेमा आता २१ एप्रिल,२०२३ ला नाही,तर पुढील वर्षी दिवाळीत सिनेमागृहात रिलीज होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Semi Final Scenario : भारताने बाजी मारली, तरीही उपांत्य फेरीचे स्थान संकटात! ऑस्ट्रेलियाचा अडथळा, जाणून घ्या चक्रावणारे समीकरण

Ketan Agarwal Killed Case : सिया आणि प्रियकर चेतनने रचला थंड डोक्याने कट; पोलिस अधीक्षक संदीपसिंग गिल

Nasrapur Crime Case : पोलिसांच्या ‘ॲक्शन प्लॅन’मुळे अवघ्या १५ दिवसांत १२०० पानी आरोपपत्र

ENG vs NZ 3rd Test: टॉम लॅथम-डेव्हॉन कॉनवे यांनी इंग्लंडचा 'बँड' वाजवला; दोघांची शतकं अन् मोडला १९३० सालचा मोठा विक्रम

MI फ्रँचायझीचा धक्कादायक निर्णय! पाकिस्तानी वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिरला संघात घेतलं? भारत-पाक क्रिकेट चर्चांना उधाण

SCROLL FOR NEXT