salman khan and rakhi sawant Sakal
मनोरंजन

Salman Khan Help Rakhi Sawant: आईचे उपचार ते तिचं लग्न...प्रत्येक वेळी राखीच्या मदतीला धावला सलमान

राखी सलमान खानला आपला भाऊ मानते. राखी जेव्हा कधी अडचणीत येते तेव्हा तिला नेहमीच सलमान खानची आठवण येते.

सकाळ डिजिटल टीम

बॉलिवूड अभिनेता सलमान खानला असच इंडस्ट्रीत भाईजान म्हटले जात नाही. अनेकवेळा तो भाऊ बनून लोकांना मदत करतानाही दिसतो. त्याने अभिनेत्री राखी सावंतलाही खूप मदत केली आहे. राखी सलमान खानला आपला भाऊ मानते. राखी जेव्हा कधी अडचणीत येते तेव्हा तिला नेहमीच सलमान खानची आठवण येते.

नुकतेच राखीच्या आईचे निधन झाले आणि यादरम्यानही ती सलमानला आठवून रडताना दिसली. सलमान खानने अनेक प्रसंगी राखी सावंतला मदत केली आहे, ज्याबद्दल अभिनेत्रीने उघडपणे सांगितले. जाणून घेऊया आतापर्यंत कोणत्या केसेसमध्ये सलमानने 'मसिहा' बनून राखीला मदत केली आहे.

जेव्हा राखी सावंत 'बिग बॉस 14' मध्ये होती तेव्हा तिला समजले की तिची आई आजारी आहे. बाहेर आल्यानंतर तिला समजले की तिच्या आईला कॅन्सर झाला आहे आणि त्यानंतर सलमान खानने तिच्या आईला उपचारात मदत केली. याची माहिती खुद्द अभिनेत्रीनेच लोकांना दिली होती.

राखी सावंतने रितेश नावाच्या व्यक्तीसोबत केलेल्या गुपचूप लग्नामुळे खूप चर्चेत आली होती. ती पती रितेशसोबत 'बिग बॉस 15'मध्येही दिसली होती. यादरम्यान रितेशने अनेकवेळा राखीसोबत गैरवर्तन केले होते आणि त्यानंतर सलमानने अभिनेत्रीला समजावले होते आणि रितेशला फटकारले होते.

राखी सावंत 'बिग बॉस'च्या अनेक सीझनमध्ये दिसली आहे. ती 'बिग बॉस 16' मध्येही दिसणार असल्याची चर्चा होती. मात्र, हिंदी बिग बॉसऐवजी ती 'बिग बॉस मराठी सीझन 4' मध्ये दिसली. 'बिग बॉस'मधून बाहेर पडल्यानंतर राखीने सलमान खानचे आभार मानले कारण तिला 'बिग बॉस मराठी'मध्ये प्रवेश मिळाला.

काही काळापूर्वी राखी सावंतने अचानक लग्नाची घोषणा करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला होता. राखीने सात महिन्यांपूर्वी आदिल खानशी लग्न केल्याचे सांगितले होते. यासाठी अभिनेत्रीने तिचा धर्म आणि नावही बदलले होते. राखीने तिच्या लग्नाच्या बातमीने सर्वांना आश्चर्यचकित केले होते, तर तिचा पती आदिल हे स्वीकारत नव्हता.

काही दिवसांनी आदिलने राखीसोबतचे लग्न मान्य केले होते. त्यानंतर राखीने खुलासा केला की सलमान खानने तिचे लग्न वाचवले. राखीने सांगितले की, सलमान भाईने आदिलशी फोनवर बोलून त्याला समजावले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thailand Pub Fire : पबमध्ये मध्यरात्री भीषण अग्नितांडव, २७ जणांचा होरपळून मृत्यू, ६३ गंभीर जखमी; दुर्घटनेचा थरारक व्हिडिओ समोर

Constitutional Amendment India: मंत्रिपदावरून हटविण्याऐवजी निलंबन;प्रस्तावित १३०व्या घटनादुरुस्ती विधेयकाबाबत संसदीय समितीची शिफारस

शेतकऱ्यांना ३१ जुलैपूर्वी कर्जमाफी! ३ टप्प्यात कर्जमाफी, १५ लाख शेतकऱ्यांचा ७/१२ कोरा होणार; पहिल्यांदा कर्जमाफी कोणाला? निकष काय बदलले, वाचा सविस्तर...

अर्थवेध : भारतीय गुंतवणूकदारांचा विजय; ‘एफआयआय’ युगाचा अस्त?

ढिंग टांग : वैशाखनंदन संवाद..!

SCROLL FOR NEXT