Sharukh khan,Salman Khan Google
मनोरंजन

2023 मध्ये शाहरुख-सलमान मोठ्या पडद्यावर एकत्र;लवकरच सिनेमाची घोषणा...

स्वतः दबंग खानने त्याच्या वाढदिवसानिमित्तानं दिली खुशखबर,बजरंगी भाईजानच्या सीक्वेलचे नावही सांगितले...

प्रणाली मोरे

सलमान(Salman Khan) आणि शाहरुख(Shahrukh Khan) या दोन खान्सनी स्वतःची अशी एक स्वतंत्र जागा बॉलीवूडमध्ये निर्माण केली आहे. शाहरुखला बॉलीवूडचा 'किंग खान' तर सलमानला 'बॉलीवूडचा भाई' म्हणून ओळखलं जातं. बॉक्सऑफिसवर दोघांचे सिनेमे धडकले की धमाका झालाच समजायचा. आता हे झालं यांच्या प्रोफेशनल लाईफविषयी पण पर्सनल लाइफमध्येही दोघे एकमेकांचे चांगले मित्र आहेत. आर्यन खानला अटक झालेली असताना सलमान खान ही पहिली व्यकती होती ज्यानं मित्र म्हणून शाहरुखच्या घरी धाव घेतली होती. आता सगळं या दोन मित्रांमध्ये आलबेलं झालं असलं तरी मध्ये काही अशी वर्षही गेली जेव्हा या दोघांमधनं विस्तव जात नव्हता. आणि याचं कारण होतं ऐश्वर्या राय-बच्चन. असो तो एक मोठा वादाचा मुद्दा आहे. पण आपण पुन्हा कशाला दोघांमधले रुसवे-फुगवे बाहेर काढायचे. चांगलं ते पाहूया की.

सलमान आणि शाहरुखचा 'करण-अर्जुन' सिनेमा कोणाला आठवणार नाही? त्यावेळी केवळ सिनेमा सुपरहीट ठरला नव्हता तर सलमान-शाहरुखची ऑनस्क्रीन केमिस्ट्रीलाही लोकांनी डोक्यावर उचलून धरलं होतं. प्रत्यक्ष आयुष्यात सलमान शाहरुखपेक्षा थोडा लहान असला तरी त्या सिनेमात त्यानं शाहरुखच्या मोठ्या भावाची म्हणजे करणची भूमिका केली होती. तर शाहरुखनं अर्जुन या लहान भावाची व्यक्तीरेखा साकारली होती. काही दिवसांपूर्वी बातमी होती की करण-अर्जुनचा रीमेक किंवा सीक्वेल आणायचा निर्मात्यांचा विचार आहे. पण अजुनतरी तो विचार विचाराधीनच राहिलाय. असो,पण आता सलमाननंच त्याच्या वाढदिवशी त्या दोघांच्या चाहत्यांना खुशखबर दिलीय.

येत्या २०२२ या नवीन वर्षात सलमान खानचा कतरिनासोबतचा 'टायगर ३' सिनेमा प्रदर्शित होत आहे. तर शाहरुखचा 'पठाण' हा सिनेमा त्याआधी काही दिवस प्रदर्शित होतोय. दोन्ही सिनेमे यशराज फिल्म्सचे आहेत. तर या दोन्ही सिनेमात मैत्रीखातर आणि निर्माता एकच म्हणून दोघांनीही एकमेकांसोबत काम केले आहे,म्हणजे पाहुण्या कलाकाराची भूमिका बरं का. म्हणजे त्यानिमित्तानं ते दोघे एकत्र दिसतील पण आज सलमानने मात्र आपण शाहरुखसोबत स्वतंत्र एक सिनेमा लवकरच करू, अशी आनंदाची बातमी त्यांच्या चाहत्यांना देऊन वाढदिवसाचे रीटर्न गिफ्ट दिले आहे. तर याचसोबत त्यानं आपल्या 'बजरंगी भाईजान' च्या सिक्वेलचे नाव 'पवनपुत्र भाईजान' असल्याचंही सांगितलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubman Gill : टीम इंडियाला धक्का! शुभमन गिल दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी संघातून बाहेर, 'या' खेळाडूकडे कर्णधारपदाची धुरा...

Rabies Death in Kolhapur : जयसिंगपुरात ५ जणांना चावलं पिसाळलेलं कुत्र, एका महिलेचा रेबीजने मृत्यू; ७ वर्षांच्या मुलीवरही हल्ला

Latest Marathi News Live Update : २००२ च्या तरतुदींनुसार अंदाजे १०८ कोटी रुपये किमतीचा १.३५ एकरचा व्यावसायिक भूखंड तात्पुरता जप्त केला आहे- ईडी

Malegaon Protest : मोठी बातमी ! मालेगाव अत्याचार प्रकरणी जनआक्रोश मोर्चाला हिंसक वळण, आक्रमक आंदोलक गेट तोडून कोर्टात घुसले

Donald Trump: साडेतीनशे टक्के शुल्क लावणार होतो; ट्रम्प यांच्याकडून संघर्ष थांबविल्याचा पुनरुच्चार

SCROLL FOR NEXT