Salman Khan
Salman Khan  
मनोरंजन

'राधे'च्या पायरसीविरोधात सलमान भडकला; दिला कारवाईचा इशारा

स्वाती वेमूल

सलमान खानचा Salman Khan 'राधे : युअर मोस्ट वाँटेड भाई' Radhe Your Most Wanted Bhai हा चित्रपट भारतात झी5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पे-पर-व्ह्यू अंतर्गत प्रदर्शित झाला. अत्यंत माफक किंमतीत चित्रपट उपलब्ध करून दिला तरी अवैध प्रकारे हा चित्रपट पाहणाऱ्यांवर सलमान भडकला आहे. अशांवर कारवाई करण्याचा इशाराही त्याने दिला आहे. सोशल मीडियावर पोस्ट लिहित सलमान पायरसीवर व्यक्त झाला. (Salman Khan lashes out at viewers for pirating Radhe despite reasonable price)

काय आहे सलमानची पोस्ट?

'आम्ही तुम्हाला राधे हा चित्रपट अत्यंत माफक दरात म्हणजेच २४९ रुपयांना उपलब्ध करून देत आहोत. तरीसुद्धा अनेकजण पायरेटेड साइट्सवर जाऊन हा चित्रपट पाहत आहेत. पायरसीसारखा मोठा गुन्हा काहींकडून होत आहे. त्या सर्व पायरेटेड साइट्सविरोधात सायबर सेल कारवाई करणार आहे. पायरसीमुळे तुम्ही कायदेशीर बाबींमध्ये अडकू शकता हे समजून घ्या', अशी पोस्ट त्याने लिहिली. पायरसीचे प्रमाण वाढल्याने त्याचा फटका व्यावसायिकांना बसत आहे. पायरसीमुळे केवळ शुल्कातून जमा होणाऱ्या उत्पन्नावरच परिणाम झालेला नाही तर जाहिरातीतून मिळणाऱ्या उत्पन्नातही घट झाली आहे.

जवळपास वर्षभर प्रतीक्षा केल्यानंतर सलमानने 'राधे' हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला. यावेळी त्याने थिएटर मालकांची माफीदेखील मागितली. त्याचसोबत एक चित्रपट तयार करण्यासाठी अनेकांची मेहनत असल्याने पायरसीसारखा गुन्हा करू नका, अशी विनंतीही त्याने चाहत्यांना दिली.

प्रभूदेवा दिग्दर्शित या चित्रपटाला प्रेक्षकांकडून संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. हा चित्रपट ४० देशांमध्ये प्रदर्शित झाला असून जगभरातील पहिल्या दिवसाची कमाई ही चार कोटींवर झाली. तर ओटीटीवर पहिल्या दिवशी ४० लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले. या चित्रपटात सलमानसोबतच दिशा पटानी, रणदीप हुडा, जॅकी श्रॉफ यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मानवतेला धक्का देणारी घटना! पतीसोबत भांडण झाल्यावर आईने 6 वर्षाच्या मुलाला केलं मगरीच्या हवाली

Latest Marathi News Update : पक्षाच्या वरिष्ठांनी माझ्या पत्राचा विचार केल्याने राजीनामा मागे घेत आहे- नसीम खान

Google Ads Policy: डीपफेक पॉर्न बनवणाऱ्या अ‍ॅप्सवर गुगल करणार सर्जिकल स्ट्राईक, कडक केले जाहिरातीचे नियम

Kidney Transplant : आईने किडनी देऊन मुलाला दिले जीवनदान ; नांदेड येथे यशस्वी किडनी प्रत्यारोपण

Car Care Tips : ‘या’ चुकांमुळे कमी होऊ शकते इलेक्ट्रिक कारची रेंज, अशी घ्या काळजी

SCROLL FOR NEXT