salman isabell 
मनोरंजन

सलमान खान करणार कतरिनाची बहीण इसाबेलला लॉंच?

दिपाली राणे-म्हात्रे

मुंबई- बॉलीवूडमध्ये सलमान खानने आत्तपर्यंत अनेकांना लॉन्च केलं आहे. बॉलीवूडमधली अनेक मंडळी सलमान खानला या बाबतीत खूप मानतात. त्याने कित्येकांना पहिलाच ब्रेक मोठा दिला आहे. अभिनेत्री कतरिना कैफला देखील त्यानेच ब्रेक दिला होता. त्यानंतर दोघांच्या अफेअरची चर्चा अनेक वर्ष रंगली होती. 2005 मध्ये मैंने प्यार क्‍यों किया या सिनेमातून कतरिनाने सलमानसोबत बॉलीवूडमध्ये पदार्पण केल होतं. आता कतरिनाला बॉलीवूडमध्ये जवळपास 15 वर्षे झाली असून ती टॉपच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. आता कतरिनापाठोपाठ तिची लहान बहीण इसाबेल कैफ देखील लोकप्रिय होत आहे. इसाबेलच्या चाहत्यांमध्येही मोठी वाढ होतेय. 

कतरिना कैफची लहान बहीण इसाबेलने माशा-अल्लाह या गाण्यातून आता बॉलीवूडमध्ये एंट्री केली आहे. इसाबेलचं हे गाणे नुकतेच रिलीज झालं असून त्याला चांगला प्रतिसाद देखील मिळत आहे. बॉलीवूडमध्ये कतरिनाला लॉंच करणाऱ्या सलमान खानने काही दिवसांपूर्वीच तीचं हे गाणं त्याच्या सोशल मिडियावर शेअर करत तिचं कौतुक केलं होतं. इतकंच नाही तर तिच्या गाण्यासोबत तिच्या लूकचीही स्तुती केली होती. आता सलमानच्या या कमेंटवरुन  तो लवकरंच इसाबेलला देखील लॉंच करेल अशी चर्चा सोशल मिडियावर सुरु आहे. 

तसं पाहायला गेलं तर सलमान खानने बॉलीवूडमध्ये नवीन अभिनेत्रींना लॉंच करण्याबाबच सांगायचं झालं तर नव्वदच्या दशकात भाग्यश्री, नगमा, रवीना टंडन, आयेशा जुल्का, रेवती यासारख्या अभिनेत्रींना देखील सलमाननेच पहिली संधी दिली होती. त्यानंतर सलमानने झरीन खान, डेझी शाह, सोनाक्षी सिन्हा, कतरिना कैफ या अभिनेत्रींनाही बॉलीवूडजमध्ये एंट्री दिली. 

 salman khan to launch katrinas sister isabel kaif in bollywood

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT