Salman Khan New Car
Salman Khan New Car Esakal
मनोरंजन

Salman च्या नवीन बुलेटप्रूफ कारपेक्षा चर्चेत आलीय त्याची नंबर प्लेट.. जीवाला धोका म्हणूनच खास वापरलाय 'हा लकी नंबर

प्रणाली मोरे

Salman Khan New Car: बॉलीवूडचा सुपरस्टार सलमान खानला जीवे मारण्याची धमकी मिळाली होती. त्यानंतर त्याच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली. आता त्यानं एक नवी गाडी खरेदी केली आहे,जी बुलेटप्रूफ आहे. पहिलं तर या करोडोंची किंमत असलेल्या गाडीची जोरदार चर्चा झाली होती,पण आता या गाडीच्या नंबर प्लेटनं सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे,जो नंबर म्हणे दबंग खानसाठी खूप खास आहे. तुम्हाला माहित आहे का या नंबर प्लेटच्या मागची कहाणी?

सलमान खानच्या नवीन सेव्हन-सिटर SUV च्या नंबर प्लेटशी सलमानचं खास नातं आहे. रिपोर्ट्सनुसार, या नंबर प्लेटसाठी २ करोड रुपये भाईजाननं खर्च केले आहेत. कारचा नंबर २७२७ आहे. ही सलमानची वाढदिवसाची तारिख आहे. त्याचा जन्म २७ डिसेंबर १९६५ साली झाला होता बोललं जात आहे की तो या नंबरला लकी नंबर मानतो.(Salman Khan New SUV bulletproof Number Plate)

Salman Khan New Car

समोर आलेल्या माहितीनुसार ही कार B6 किंवा B7 लेव्हल प्रोटेक्शन सोबत येते. B6 बौलेस्टिक प्रोटेक्शनसाठी जवळपास ४१ एमएम च्या जाडसर काचा बसवललेल्या असतात ज्या हाय पावरवाल्या बंदूकीच्या गोळ्यांपासून संरक्षण करतात.

तर B7 ला ७८ एमएमच्या मोठ्या काचा बसवलेल्या असतात ज्या बंदूकीच्या गोळ्यांचा सामना सहज करतात.

बोललं जात आहे की ही गाडी सलमान खानची टोयोटा लॅंड क्रुझर LC200 ची जागा घेईल,जिला कव्हर आणि बुलेटप्रूफ ग्लासनं मॉडिफाय केलं गेलं होतं.

सलमानन खानच्या 'किसी का भाई किसी की जान' सिनेमाची सध्या सगळीकडेच हवा आहे. नुकताच हा ट्रेलर लॉंच करण्यात आला आहे. या खास क्षणी सिनेमातील संपूर्ण स्टारकास्ट उपस्थित होती.

यात व्यंकटेश दग्गुबत्ती, पूजा हेगडे,जगपति बाबू, भूमिका चावला,विजेंद्र सिंग, अभिमन्यु सिंग,राघव जुयाल, शहनाज गिल, सिद्धार्थ निगम,पलक तिवारी,जस्सी गिल आणि विनाली यांचा समावेश होता.

सलमानच्या वर्कफ्रंट विषयी बोलायचं झालं तर सलमान खानचा 'किसी का भाई किसी की जान' सिनेमा २१ एप्रिल रोजी रिलीज होणार आहे. याव्यतिरिक्त त्याचा 'टायगर ३' देखील रिलीजच्या वाटेवर आहे.

या सिनेमात शाहरुख खान कॅमियो साकारणार आहे. यामध्ये कतरिना कैफ,इमरान हाश्मी देखील आहे. तसंच सलमान 'टायगर वर्सेस पठाण' मध्ये शाहरुखसोबत अॅक्शन करताना दिसेल.यशराज फिल्म्सचा हा स्पाय युनिव्हर्स सिनेमा २०२५ साली रिलीज होणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan: पाकव्याप्त काश्मीरला व्हायचंय पाकिस्तानपासून वेगळं! कशामुळे झालाय स्थानिकांचा उद्रेक? जाणून घ्या

Team India Head Coach : टीम इंडिया नवीन कोचच्या शोधात; पगारापासून ते वयापर्यंत, BCCIने ठेवल्या 'या' कडक अटी

Share Market Today: शेअर बाजार सुरु झाल्यानंतर आज 'या' शेअर्सवर ठेवा लक्ष; काय आहे तज्ज्ञांचा अंदाज?

Zeenat Aman: "पडद्याआड बरंच काही..."; झीनत अमान यांच्या लिव्ह-इन रिलेशनशिपच्या वक्तव्यावर सलमानच्या एक्स गर्लफ्रेंडची प्रतिक्रिया

रेडिमेड कपड्यांचा व्यवसाय सोडून राजकारणात, ५ वेळा अटक,  बिहारमध्ये भाजपचा सर्वात मोठा चेहरा कसे बनले सुशील मोदी?

SCROLL FOR NEXT