Salman Khan  Instagram
मनोरंजन

Salman Khan: 'मी प्रेमात नेहमीच..', अखेर अनेक वर्षांनी रिलेशनशीपमधील अपयशावर सलमान स्पष्टच बोलला..

रजत शर्मा यांच्या 'आप की अदालत' कार्यक्रमात गेला असताना सलमान खाननं हा खुलासा केला आहे.

प्रणाली मोरे

Salman Khan: बॉलीवूड अभिनेता सलमान खाननं आपल्या रिलेशनशीप स्टेटसवर मोठा खुलासा केला आहे. सलमान खान काही दिवसांपूर्वी 'आप की अदालत' कार्यक्रमात पोहोचला होता. 'आप की अदालत' मध्ये जेव्हा शो चे होस्ट रजत शर्मा यांनी भाईजानला त्याच्या रिलेशन शीप स्टेटसविषयी विचारलं तेव्हा सलमान खाननं कोणतीही मजा मस्करी न करता अगदी स्पष्ट शब्दात उत्तर दिलं. अभिनेत्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.(Salman Khan on his relationship status in rajat sharma's aap ki adalat show)

मेकर्सनी युट्यूबवर 'आप की अदालत' या कार्यक्रमाचा एक टीझर प्रोमो रिलीज केला आहे. प्रोमोच्या सुरुवातीला सलमान खान आपल्या अनोख्या अंदाजात एंट्री करताना दिसत आहे. जसं सलमान खान आरोपीच्या पिंजऱ्यात गेला तसं रजत शर्मा यांनी त्याला 'किसी का भाई किसी की जान' सिनेमाच्या ट्रेलर लॉंच वेळी त्यानं केलेल्या 'मूव्ह ऑन' कमेंटवर प्रश्न केला.

सलमान हसत म्हणाला,''प्रेमाच्या बाबतीत मी कमनशिबी आहे सर''. मग रजत शर्मा यांनी विचारलं,'तर आजकाल कोण आहे तुझी जान?तू कोणाशी कमिटमेंट केलीयस?'

सलमान म्हणाला,''मी फक्त आजकाल भाईच आहे. माझं ज्यांच्यावर प्रेम होतं ,ज्यांना मला जान बनवायचं होतं ते आजकाल मला 'भाई' म्हणून बोलावत आहेत..काय करू?''

आता हे काही पहिल्यांदा घडत नाही जिथे सलमान खान 'आप की अदालत' मध्ये आला आहे. याआधी देखील २०१२ मध्ये आपल्या 'दबंग' सिनेमाच्या प्रमोशन दरम्यान सलमान शो मध्ये दिसला होता. तर यावेळी सलमान 'किसी का भाई किसी की जान' सिनेमाच्या प्रमोशन दरम्यान दिसला. सलमान आणि पूजा हेगडेचा हा सिनेमा सध्या सिनेमागृहात चाहत्यांचे मनोरंजन करत आहे. या सिनेमानं आतापर्यंत बॉक्सऑफिसवर ९०.१५ करोडची कमाई केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MLA Prakash Solanke : मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला प्रकाश सोळंके यांचा पाठिंबा; सोशल मीडियावर 'मी येतोय तुम्ही या'चे आवाहन

Pune Flood : पुणे शहरात पुरामुळे पंधराशे नागरिकांना हलविले; मुळामुठा नदीत ८५ हजार क्यूसेस पाणी सोडले

पोलिस भरतीचे वेळापत्रक ठरलं! राज्यात १५,६३१ पोलिसांची भरती; वयोमर्यादा संपलेल्या ‘या’ उमेदवारांना एक संधी; अर्जासाठी ४५० ते ३५० रुपये शुल्क

Donald Trump: ट्रम्प यांच्या शपथविधीपूर्वीचे अपशकुन अन् दुर्याेधनाच्या जन्माची वेळ; भारतावरचं सर्वात मोठं संकट?

Maharashtra Latest News Update: राज्यासह देशात आज दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT