Salman Khan and Palak Tiwari Sakal
मनोरंजन

Salman Khan: सलमान खानने पलक तिवारीच्या रिलेशनशिपचा केला खुलासा! म्हणाला 'ती तर आधीच...'

पलकने याआधी सलमानच्या 'अंतिम' चित्रपटासाठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलं होतं. आता 'किसी का भाई किसी की जान' या चित्रपटात ती भूमिका साकारतेय.

Aishwarya Musale

गेल्या दिवशी अखेर सलमान खानचा मोस्ट अवेटेड चित्रपट 'किसी का भाई किसी की जान'चा ट्रेलर रिलीज झाला. या खास प्रसंगी, ट्रेलर लॉन्च इव्हेंटमध्ये सलमानसह चित्रपटाचे संपूर्ण कलाकार उपस्थित होते. पूजा हेगडे, जगपती बाबू, भूमिका चावला, विजेंदर सिंग, राघव जुयाल, सिद्धार्थ निगम, जस्सी गिल, शहनाज गिल, पलक तिवारी आणि विनाली भटनागर या कार्यक्रमात स्टायलिश अवतारात पोहोचले.

यादरम्यान सलमान खानने पलक तिवारीच्या रिलेशनशिप स्टेटसबद्दल बोलल्याचे बोलले जात आहे. भले भाईजानने असे काही सांगितले असेल किंवा नसेल. ती सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम अली खान याला डेट करत असल्याच्या बातम्या येत आहेत.

अभिनेत्री शहनाज गिल आणि राघव जुयाल या दोघांच्या रिलेशनशिपबाबत गेल्या काही दिवसांपासून चर्चा होत्या. सलमानने मात्र या स्टोरीला वेगळाच ट्विस्ट दिला आहे. राघव जुयाल हा ट्रेलर लाँचिंगच्या कार्यक्रमात सलमानचं तोंडभरून कौतुक करत होता. त्याचप्रमाणे त्याने चित्रपटात काम करण्याची संधी दिल्याबद्दल ‘भाईजान’चे आभार मानले. सलमानने त्याचवेळी राघवच्या खासगी आयुष्याबद्दल पोलखोल केली.

“मला या चित्रपटादरम्यान एक केमिस्ट्री पहायला मिळाली. मात्र त्याला कोणीच पुढे नेण्याचा प्रयत्न करत नव्हता. सिद्धार्थ (निगम) भावा, तू तरी बोल. तू सुद्धा पाहिले की नाही? कोणीच एक पाऊल पुढे नेत नाही. जर एखाद्याने प्रयत्न केला तर दुसरी व्यक्ती एक पाऊल मागे जायची. ही पलक का?”

पलक तिवारी हे सर्व ऐकून फक्त तिची मान हलवते आणि त्याविषयी काहीच न बोलण्यास सलमानला सांगते. राघव तेव्हा म्हणतो की, “ते प्रेम आणि काम काय, ज्याची चर्चाच होणार नाही.” सलमान पुन्हा यावर म्हणतो, “पलक ही खूप चांगली गोष्ट आहे.

सलमानचा 'किसी का भाई किसी की जान' हा पलक तिवारीचा हा पहिलाच हिंदी चित्रपट आहे. ती अभिनेत्री श्वेता तिवारीची मुलगी आहे. पलकशिवाय शहनाज गिलचाही हा पहिलाच हिंदी चित्रपट आहे. पलक अनेकदा इब्राहिम अली खानसोबत पार्ट्यांमध्ये फिरताना दिसली आहे. त्यामुळे बी-टाऊनमध्ये त्यांच्या डेटिंगच्या अफवा पसरल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG, 2nd T20I: रवी बिश्नोईची 'ती' चूक महागात पडली! जेकब बेथलच्या आक्रमणामुळे भारताविरुद्ध इंग्लंडचा ऐतिहासिक विजय

IND vs ENG, 2nd T20I: अक्षर पटेलने इंग्लंडच्या कॅप्टनला आऊट करत घडवला इतिहास; यापूर्वी कोणत्याही भारतीय फिरकीपटूला जमलं नव्हतं!

जळगावमध्ये भीषण अपघात! टोलनाक्यावर उभ्या ट्रकला गॅस टँकरची धडक, बघता क्षणी घेतला पेट, आगीत होरपळून दोघांचा मृत्यू

Latest Marathi Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Raigad Heavy Rain : रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा; अंबा नदी धोक्यापलीकडे, भेरव पूल पाण्याखाली, पोलादपुरात दरड कोसळल्याने नागरिकांचे स्थलांतर

SCROLL FOR NEXT