Salman Khan on South vs Bollywood debate Google
मनोरंजन

Bollywood v/s South: अखेर सलमाननं तोडली चुप्पी, भरोसा वाटत नाही म्हणाला...

सलमान खान साऊथच्या 'विक्रांत रोना' सिनेमाचा प्रेझेंटर आहे. या सिनेमाच्या हिंदी व्हर्जनचं सध्या तो प्रमोशन करत आहे.

प्रणाली मोरे

(South Movie) साऊथ सिनेमा विक्रांत रोना(Vikrant Rona) याच आठवड्यात २९ जुलै रोजी प्रदर्शित होत आहे. या सिनेमाचा प्रेझेंटर सलमान खान आहे. अनेक दिवसांनंतर सलमान खान (Salman Khan) कोणत्यातरी कार्यक्रमाचा भाग बनत होता. काही दिवसांपूर्वी त्याला जीवे मारण्याच्या मिळालेल्या धमकीमुळे सुरक्षेच्या कारणास्तव विक्रांत रोना चा प्रमोशनल इव्हेंट त्याच्या घराच्या जवळच ठेवण्यात आला होता.(Salman Khan on South vs Bollywood debate)

विक्रांत रोनाच्या प्रमोशनल इव्हेंटमध्ये सलमानने अखेर पहिल्यांदाच साऊथ विरुद्ध बॉलीवूड या वादातीत विषयावर मौन सोडलं. सलमान खानने म्हटलं आहे की,साऊथचे सिनेमे बॉक्सऑफिसवर खूप चांगली कमाई करीत आहेत. प्रत्येकाचा चांगले सिनेमे बनवण्याचा प्रयत्न असतो पण दरवेळी बॉक्सऑफिसवर यश मिळेलच याचा काही भरोसा नसतो. विक्रांत रोनाच्या हिंदी व्हर्जनला प्रमोट करण्यासाठी आलेल्या सलमान खानने म्हटलं की, मी देखील विक्रांत रोनाला प्रेझेंट करत आहे. म्हणून प्रमोशनसाठी आलो आहे,मला देखील तोट्यात जायचं नाहीय. साऊथचे सिनेमे खरंच खूप चांगलं प्रदर्शन करत आहेत.

सलमान याच विषयाला धरुन पुढे म्हणाला, आपण सगळेच सिनेमा चांगला बनावा म्हणून प्रयत्न करतो. आम्हाला वाटतं सिनेमा सगळ्यांपर्यंत पोहोचावा. कधी-कधी हे काम करतं,कधी-कधी काम करत नाही. प्रमोशन केल्यावर १०० टक्के हा फॉर्म्युला काम करेलच असं सांगता येत नाही.

याच विक्रांत रोनाच्या प्रमोशन इव्हेंटमध्ये किच्चा सुदीपनेही बॉलीवूड-साऊथ वादावर भाष्य केलं. तो म्हणाला,तो दाक्षिणात्य सिनेमांच्या यशाची तुलना कोणाशीच करत नाही. जर बॉलीवूडचे सिनेमे चांगले चालले नसते तर इतके वर्ष ही इंडस्ट्री तग धरुन राहिलीच नसती. एका वर्षात खूप सिनेमे बनतात, प्रत्येक सिनेमा चांगला चालेलच असं नाही. एखाद-दोन सिनेमे चांगले चालतात,काही नाही चालत.

आपल्याला याविषयी थोडं सविस्तर सांगतो की,साऊथच्या सिनेमांनी बॉक्सऑफिसवर खूप चांगलं प्रदर्शन केलं आहे. पुष्पा द राइज, आरआरआर,केजीएफ चॅप्टर २ या सिनेमांनी तर मोठमोठे रेकॉर्ड तोडले आहेत. यांच्याशी तुलना केली तर आलियाच्या गंगूबाई काठियावाडी,द काश्मिर फाईल्स, भूल भूलैय्या २,जुग जुग जियो सारखे मोजके सिनेमेच तिकीट बारीवर गर्दी खेचून आणण्यात यशस्वी ठरले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा M. Chinnaswamy Stadium वरील हा शेवटचा सामना कसा? नेमकी भानगड काय? Explained

IPL 2026 Point Table: विराट कोहलीचे शतक हुकले, देवदत्त पडिक्कलने चागंलेच झोडले; RCB चा घरच्या मैदानावरील शेवटच्या लढतीत विजय

Paytm Bank: पेटीएम पेमेंट्स बँकेचा परवाना रद्द! वापरकर्त्यांवर काय परिणाम होणार? पेमेंट करता येणार का? जाणून घ्या...

Manohar Mama Arrested: आणखी एका बाबाला अटक! स्वतःला बाळूमामाचा अवतार सांगायचा; कुर्डुवाडीत गुन्हा दाखल

RCB vs GT Live: विराट कोहलीने इतिहास रचला! IPL मध्ये असा पराक्रम करणारा पहिलाच फलंदाज ठरला; गेल, रोहितच्या यादीत स्थान

SCROLL FOR NEXT