“Sunny paaji is killing it”: Salman Khan Reaction On Gadar 2 congratulates Sunny Deol Esakal
मनोरंजन

Salman Khan Reaction On Gadar 2: ढाई किलो का हाथ...भाईजानवरही चढला गदर2 चा फिवर ! दिला रिव्ह्यू

Vaishali Patil

Salman Khan Reaction On Gadar 2 : सध्या बॉलिवूडमध्ये सनी देओलच्या गदर 2 आणि अक्षयच्या OMG 2 ची चर्चा आहे. या दोन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केली असली तरी सनी पाजीच्या गदर 2 ने यात बाजी मारली आहे.

गदरची क्रेझ चाहत्यांमध्ये मोठ्या प्रमाणात दिसून आली. तब्बल 23 वर्षांनी या चित्रपटाचा सिक्वेल आला आणि प्रेक्षकांनी या चित्रपटाला भरभरुन प्रेम दिलं. या चित्रपटाला मिळणारा प्रतिसाद पाहिल्यानंतर बॉलिवूडचा भाईजान सलमान खानही स्वतःला गदर 2 चं कौतुक करण्यापासून थांबवू शकला नाही. त्याने देखील सनी देओलचं आणि पुर्ण टिम खुप कोतूक करत पोस्ट शेयर केली.

गदर 2 बाबत सलमाननं सोशल मीडियावर एक पोस्ट शेयर करत या चित्रपटाच्या कमाई बाबत अपडेट दिली . गदर 2 चे पोस्टर शेअर करताना सलमान खानने लिहिलं की, 'ढाई किलो का हाथ 40 कोटींच्या ओपनिंग बरोबर आहे. सनी पाजीने कमाल केली. गदर 2 च्या संपूर्ण टीमचे अभिनंदन.'

गदर 2 ने पहिल्याचं दिवशी बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केली. या चित्रपटाने पहिल्या दिवशी 40 ते 45 कोटींची कमाई केली आहे. या कमाईनुसार आता पठाण नंतर सर्वात मोठी ओपनिंग देणारा दुसरा सिनेमा गदर 2 ठरला आहे. आता लवकरच हा सिनेमा 100 कोटींचा टप्पा पार करेल अशी अपेक्षा चाहत्यांना आणि चित्रपटाच्या निर्मात्यांना देखील आहे.

सनी देओल आणि अमिषा पटेल यांच्या 2001 मध्ये आलेल्या गदर: एक प्रेम कथा या चित्रपटाचा सिक्वेल असलेल्या या सिनेमात सनी देओल आणि अमिषा पटेल यांच्या सुपरहिट जोडी व्यतिरिक्त उत्कर्ष शर्मा, सिमरत कौर आणि मनीष वाधवा सारखे कलाकार या चित्रपटात आहेत.

या चित्रपटाला समिक्षकांच्या देखील समिंश्र प्रतिसाद मिळाला आहे. काहींनी हा चित्रपट फुल मनोरंजन करणारा वाटला तर काहींना निव्वळ कंटाळवाणा. आता त्यातच सलमान खाननं चित्रपटाचं कौतुक केल्यानंतर आता भाईजानचे चाहतेही हा चित्रपट पाहण्यासाठी उत्सूक दिसताय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane News: काँग्रेस नेत्यांवर थेट आरोप! माजी नगरसेवकांचा पक्षत्याग, भाजपात प्रवेश करत नाराजी उघड केली

गिरीश ओक-निवेदिता सराफची जोडी पुन्हा पहायला मिळणार, 'बिन लग्नाची गोष्ट'सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित, प्रिया बापट आणि उमेश कामतची गोड केमिस्ट्री

Soldier caught pigeon on border : भारत-पाकिस्तान सीमेजवळ जवानांनी पकडलं एका गंभीर धमकीच्या पत्रासह कबुतर!

Maharashtra Latest News Update: राष्ट्रीय महामार्गांवर दुचाकी वाहनांना टोल नाही, NHAI चे अधिकृत स्पष्टीकरण

बाप से बेटा सवाई! छोट्या किंग खान आर्यनचा व्हिडिओ पाहिला का? आवाज, दिसणं आणि स्टाइल सगळं काही तेच, व्हिडीओ होतोय व्हायरल

SCROLL FOR NEXT