Salman Khan Esakal
मनोरंजन

Salman khan: पुरस्कार मिळाला नाही म्हणून तावातावानं परफॉर्म न करताच निघून चाललेला भाईजान.. पण तितक्यात.. वाचा किस्सा

नुकतंच सलमाननं फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्याच्या पत्रकार परिषदेत १९९० सालचा एक जुना घडलेला सत्य किस्सा सांगून सगळ्यांना हैराण केलं आहे.

प्रणाली मोरे

Salman Khan: बॉलीवूड अभिनेता सलमान खान नेहमीच चर्चेत असलेला पहायला मिळतो. सलमान खानचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतात. आता सध्या फिल्मफेअर 2023 च्या पत्रकार परिषदेतले काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत.

या पुरस्कार सोहळ्याचं सूत्रसंचालन सलमान खान करणार आहे. या पत्रकार परिषदेत सलमाननं अॅवॉर्ड शो संबंधित एक किस्सा शेअर केला,जेव्हा त्याला बेस्ट अॅक्टरची ट्रॉफी मिळणार होती. पण असं झालं नाहूी आणि त्यानं अॅवॉर्ड शो मध्ये परफॉर्म करण्यास नकार दिला होता. (Salman Khan refused to perform in award show after they did not give best actor trophy)

तो किस्सा शेअर करताना सलमान खान म्हणाला,''मला सांगितलं गेलं होतं की मला फिल्मफेअर अॅवॉर्ड शो मध्ये यायचं आहे आणि मला बेस्ट अॅक्टर पुरस्कारानं सम्मानित करण्यात येईल. त्यामुळे मी माझ्या कुटुंबाला घेऊन सोहळ्यात पोहोचलो होतो''.

'' माझ्या वडीलांनी छान सूट घातला होता. त्यानंतर नॉमिनेशन्स सांगितले गेले आणि बेस्ट अॅक्टरचा पुरस्कार जॅकी श्रॉफला मिळाला. त्यावर वडील म्हणाले,हे काय आहे?''

''त्या रात्री मी सोहळ्यात परफॉर्म देखील करणार होतो,मी बॅकस्टेजला गेलो आणि सांगितलं की मी परफॉर्म करणार नाही. मला काही फरक नाही पडत यानं''.

हेही वाचा: सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

सलमान तेव्हा म्हणाला, तो अॅवॉर्ड जॅकी श्रॉफला मिळालाय. नो डाऊट..त्यानं 'परिंदा' मध्ये कमाल काम केलंय,पण तुम्हा लोकांना माझ्यासोबत असं करायला नको हवं होतं. तुम्ही माझ्या वडीलांचे मित्र आहात मग तर तुम्ही माझ्याशी असं अजिबात वागायला नको हवं होतं''.

त्यावर समोरुन मला म्हटलं गेलं की,''मला परफॉर्म करावं लागेल. पण मी स्पष्ट नकार दिला. त्यानंतर मला परफॉर्मन्ससाठी पैसे देण्याची गोष्ट बोलली गेली''.

मी विचारलं,''किती द्याल?''

तर त्यांनी मला एक किंमत सांगितली.

सलमान खान पुढे म्हणाला,''ती किंमत ऐकल्यावरही मी काही तयार होत नव्हतो तेव्हा त्यांनी त्या किंमतीच्या पाच पट पैसे देऊ केले गेले. आणि म्हटलं गेलं,'प्लीज..कुणाला सांगू नको'.

तर मी म्हणालो,''तुम्ही चुकीच्या माणसाला हे सांगताय''.

माझं हे उत्तर ऐकून ते जोरजोरात हसू लागले.

माहितीसाठी इथं सांगतो की १९९० मध्ये जॅकी श्रॉफला 'परिंदा' सिनेमासाठी बेस्ट अॅक्टरचं फिल्मफेअर अॅवॉर्ड मिळालं होतं. तेव्हा 'मैने प्यार किया' साठी सलमान खानचे नाव देखील चर्चेत होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Politics : संजय पाटील यड्रावकर आणि राजू शेट्टींचे पीए स्वस्तिक पाटील यांच्यात जोरदार खडाजंगी, "तुमचा काय संबंध"; नगपरिषदेतच हाय व्होल्टेज ड्रामा

Nagpur Land Survey : नवीन नागपूरसाठी जमिनीच्या संयुक्त मोजणीला सुरुवात; शेतकऱ्यांचे सहकार्य; विविध यंत्रणांचा सहभाग!

Latest Marathi Breaking News Live Update : नागपूरमध्ये काँग्रेसच्या गटबाजीला कंटाळून 221 पदाधिकाऱ्यांचा सामूहिक राजीनामा

Indian Railways Recruitment 2025: भारतीय रेल्वेत ज्युनियर इंजिनिअरच्या पदांसाठी भरती सुरू; येथे वाचा संपूर्ण माहिती

BJP vs Shivsena: २०२९ तयारी? भाजपमधील इनकमींगची दूसरी बाजू काय? शिंदे गटाच्या नेत्यांविरुद्ध ‘स्ट्राँग प्लॅन-B’ तयार?

SCROLL FOR NEXT