Salman Khan And Ahan Shetty esakal
मनोरंजन

आयफा पुरस्कार सोहळ्यात सलमान खान झाला भावूक, अहान शेट्टीच्या गळ्यात पडून...

आयफा पुरस्कार सोहळ्यात सलमान खान झाला भावूक

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : आयफा पुरस्कार २०२२ चे काही व्हिडिओज सोशल मीडियावर खूपच व्हायरल होत आहेत. यातील एक व्हिडिओज् मध्ये सलमान खानचाही एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला आहे. यात पुरस्कार समारंभात सूत्रसंचालन करणारे मनीष पाॅल आणि रितेश देशमुख यांच्या व्यतिरिक्त अनेक चित्रपट सिनेतारकांबरोबर सलमान खानची मस्ती पाहायला मिळाली आहे. मात्र पुढील काही क्षणात खूपच जुन्या एका घटनेची आठवण येताच सलमान भावून होऊन जातो. व्हिडिओत दिसते की रितेश देशमुख जेव्हा प्रश्न विचारतो की ज्यांचे चार दिन बाकी आहेत बेकार दिवसात सलमान खान काय करतात ? यावर उत्तर देताना अरशद वारसी उत्तर देतो, की सलमान खानचे (Salman Khan) चार दिवस जगायचे आहेत आणि आमच्या सर्वांचे बेकार दिन आहेत. खरे पाहाता सर्व आयुष्य सलमान भाई जगत आहे आणि बेकार तर आम्ही बसलो आहोत.

अरशद वारसीच्या या उत्तरावर सलमान खान म्हणतो, बेकार दिवसांमध्ये मी आयफा पुरस्कारांचे (IIFA Awards) सूत्रसंचालन करतो. यावर अरशद वारसी उद्गारतो, असे बेकार दिवस आम्हालाही मिळावेत. रितेश देशमुख या नंतर सलमान खानशी त्याच्या आयुष्यातील सर्वात संस्मरणीय दिवसाविषयी विचारतो आणि म्हणतो याचे उत्तर अहान शेट्टीला विचारावे. अहान यावर म्हणतो, आयफा पुरस्कार समारंभाचे सूत्रसंचालन करणे हे त्यांच्यासाठी संस्मरणीय होऊ शकते. यावर सलमान खानने एक अशी गोष्ट सांगतो, जे ऐकून तेथील सर्वजण भावूक झाले. सलमानने सांगितले, एक अशी वेळ होती की ज्यावेळी माझ्याजवळ पैसे नसायची, तेव्हा अहान शेट्टीचे वडील सुनील शेट्टी यांच्या सर्वात महागड्या दुकानात गेलो होतो.

जेथे पैसे नसल्याने मी केवळ एक जीन्स खरेदी केली होती. मात्र अहानच्या वडिलांनी एक महागडा शर्ट भेट दिला होता. त्याबरोबरच जेव्हा त्यांनी पाहिले की माझी नजर त्यांच्या पर्सवर होती, तर त्यांनी मला आपल्या घरी घेऊन गेले होते. एक जोडी पर्सही मला भेट दिली होती. हे सर्व सांगताना सलमान खूपच भावूक होऊन केला आणि त्यानंतर अहान शेट्टीच्या गळ्यात तो पडतो. सुनील शेट्टींविषयी कृतज्ञता व्यक्त करणाऱ्या सलमान खानचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूपच व्हायरल होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI 2nd Test Live: यशस्वी जैस्वाल खरंच RUN OUT होता का? यष्टिरक्षकाने बेल्स उडवल्या तेव्हा... वादग्रस्त निर्णय? Video

AIमुळे जॉब जाणार नाही, तर निर्माण होणार? पुढील ५ वर्षात भारतात ४० लाख रोजगार निर्मिती, NITI आयोगाचा दावा

Ichalkaranji Election इचलकरंजी महापालिकेसाठी ठाकरे गट वेगळी चूल मांडणार; 'मविआ'ची डोकेदुखी वाढण्याची शक्यता, 'या' नेत्याच्या इशाऱ्याने चर्चेला उधाण

Event Management Skills: इव्हेंट मॅनेजमेंट करायचंय? हे गुण विकसित करा!

Latest Marathi News Live Update : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पश्चिम महाराष्ट्रातील भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक

SCROLL FOR NEXT