Tere Naam 2 Esakal
मनोरंजन

Tere Naam 2: 'तेरे नाम'चा सिक्वेल येणार! सतीश कौशिक यांनी दिलेलं 'ते' वचन सलमान पुर्ण करणार

Vaishali Patil

Tere Naam 2: बॉलिवूडचा भाईजान सलमान खान हा त्याच्या आगामी 'किसी का भाई किसी की जान' या चित्रपटाच्या प्रमोशन व्यस्त आहे. अॅक्शन आणि कॉमेडीने भरलेला हा चित्रपट 21 एप्रिलला थिएटरमध्ये दाखल होणार आहे. चित्रपट प्रदर्शित होण्यास अवघे दोनच दिवस शिल्लक आहेत.

त्यामुळे चित्रपटाच्या टिमने कंबर कसली आहे. त्यामुळे चित्रपटाची टिम सध्या याच कामात व्यस्त आहे. चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान बोलतांना सलमान त्याच्या मागील हिट चित्रपटांविषयी बोलला. यावेळी त्याला त्याचा त्याचा 'तेरे नाम' चित्रपट आठवला.

इतकंच नाही तर 'तेरे नाम'च्या सिक्वेलबद्दल सतीश कौशिक यांच्याशी झालेल्या चर्चे विषयी देखील खुलासा केला.

'तेरे नाम' हा सलमानच्या हिट चित्रपटांपैंकी एक होता. 2003 साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम दिलं. हा चित्रपट सतीश कौशिक यांनी दिग्दर्शित केला होता. सतीश कौशिक आता आपल्यात नाही मात्र सलमान बोलला की त्याने 'तेरे नाम 2' कल्पनेवर सतीश कौशिक यांच्यासोबत चर्चाही केली होती.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, सलमान खानने सांगितले की, सतीश कौशिक यांनी 20 वर्षांपूर्वी 'तेरे नाम'साठी फक्त एका ओळीची आईडिया दिली आणि त्यानंतर सलमानला वाटले की ही एक सुपर आयडिया आहे. मृत्यूपूर्वी सतीश कौशिकसोबत सलमानचे चांगले संबंध असल्याचंही त्याने सांगितले.

सलमानने पुढे खुलासा केला की त्यांने 'तेरे नाम' च्या कथानकावर चर्चा केली होती आणि 20 वर्षांनंतर कथेत काय घडलं असतं याबद्दल त्याने सतीश कौशिकसोबत कथानक शेअर केले होतं. इतकचं नाही सतिश यांनी सलमानला वचन दिले होते की तो या चित्रपटेच्या पटकथेवर लवकरच काम सुरू करेल. भविष्यात कधीतरी 'तेरे नाम'चा सिक्वेल बनवण्याचा विचार करणार असल्याचं यावेळी सलमाननं सांगितलं.

सतीश कौशिक हे बॉलीवुड मधील एक दिग्गज अभिनेते, दिग्दर्शक त्यांचे 9 मार्च रोजी निधन झाले. वयाच्या 66 वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्याच्या जाण्याने बॉलिवुडवरही शोककळा पसरली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aaditya Thackeray: आता महाराष्ट्र बंद पाडणार, आदित्य ठाकरेंचा सरकारला इशारा; थेट पोलीस व्हॅनवर चढून...

IND vs WI, 3rd T20I: अभिषेक शर्माची १८ चेंडूत फिफ्टी अन् रचले तब्बल तीन विश्वविक्रम; सूर्यकुमारलाही टाकलं मागे

Kolhapur Leopard Sighting : कोल्हापूर वेशीवर पुन्हा बिबट्या; शिंगणापूर मार्गावर बिबट्याचे दर्शन, वनविभागाकडून शोधमोहीम

Maharashtra Live News : जातनिहाय जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलमची मागणी; २ नोव्हेंबरला भारत बंदचा निर्णय

CJP Leaders Serious Allegation : "आमचे मोबाईल घेतले होते, त्यावेळी त्यात खोटे पुरावे घातल्याची आम्हाला भीती!"; सुटकेनंतर सीजेपीच्या नेत्यांचा पोलिसांवर गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT