Salman vs Shahrukh esakal
मनोरंजन

Salman vs Shahrukh: भाईजान Vs किंग खान! कोण जिंकणार?

टॉलीवूडनं बॉलीवूडचे काढलेले वाभाडे कमी होते की काय म्हणून आता बॉलीवूडचे सुपरस्टार एकमेकांमध्येच स्पर्धा करताना दिसत आहे.

सकाळ डिजिटल टीम

Salman Vs Shah rukh khan: टॉलीवूडनं बॉलीवूडचे काढलेले वाभाडे कमी होते की काय म्हणून आता बॉलीवूडचे सुपरस्टार एकमेकांमध्येच स्पर्धा करताना दिसत आहे. गेल्या काही महिन्यांपासून बॉलीवूडला बॉक्स ऑफिसवर मोठा सामना करावा लागतो आहे. टॉलीवूडच्या आगळ्या वेगळ्या धाटणीच्या चित्रपटांनी नाकीनऊ आणले आहेत. अशातच बॉलीवूडमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. ती म्हणजे बॉलीवूडचा भाईजान सलमान खान आणि किंग खान शाहरुख खान यांच्या चित्रपटाचे टीझर हे एकाच वेळी प्रदर्शित होणार आहे.

सलमान खान तर बऱ्याचदा टॉलीवूडच्या चित्रपटांच्या प्रमोशनमध्ये दिसून आला आहे. आरआरआरच्या वेळेस तर त्यानं निर्मात्यांनी आयोजित केलेल्या एका ग्रँड सोहळ्यात सहभाग घेत बॉलीवूडच्या निर्माते आणि दिग्दर्शकांनी काय काळजी घ्यायला हवी, कोणते बदल आपल्या चित्रपटांमध्ये करायला हवेत याविषयी सांगितले होते. येत्या काळात आपल्याला देखील मोठ्या अडचणींचा सामना करावा लागणार आहे याची काळजी भेडसावणाऱ्या सलमाननं मग टॉलीवूडच्या चित्रपटांमध्ये कॅमिओ करण्यास सुरुवात केली. सध्या त्याचा चिरंजीवी यांच्या गॉडफादरमधील लूक प्रेक्षकांना भावला आहे.

दुसरीकडे शाहरुखही बॉक्स ऑफिसवर पुनरागमन करण्यासाठी तयार आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शाहरुखचा पठाण तर सलमानचा किसी का भाई किसी की जान हे चित्रपटाचे टीझर हे एकाच वेळी प्रदर्शित होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. दोन बड्या कलाकारांचे चित्रपटाचे टीझर एकाच वेळी प्रदर्शित होणार असल्यानं नेमका कुणाला फायदा होणार असा प्रश्न आता चाहत्यांना पडला आहे. तर नेटकऱ्य़ांनी यावरुन दोन्ही अभिनेत्यांना ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.

विशेष म्हणजे त्यांचे हे दोन्ही चित्रपटाचे टीझर आयसीसी टी 20 वर्ल्ड कपच्या वेळेस प्रदर्शित होणार असल्यानं त्यांनी आणखी मोठा धोका पत्करल्याचे सांगण्यात येत आहे. त्याच दिवशी भारत विरुद्ध पाकिस्तान हा सामनाही होणार आहे. अशावेळी प्रेक्षक काय करणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. शाहरुखचा चित्रपट हा 25 जानेवारी 2023 मध्ये प्रदर्शित होणार आहे. त्यात सलमानचाही कॅमिओ आहे. तर सलमान खानचा चित्रपट 30 डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : आषाढी वारीत दुर्दैवी घटना! जेजुरीजवळ ट्रकची वारकऱ्यांना धडक, ३ महिलांचा मृत्यू, ४ गंभीर जखमी

Ashadhi Wari: पंढरपुरात सायकलवारीचा जल्लोष! महाराष्ट्र-कर्नाटकातील ४ हजार सायकलस्वारांची हरिनामाच्या गजरात नगरप्रदक्षिणा

Nagpur: विक्रेत्याच्या चुकीची शिक्षा आता खरेदीदाराला नाही; जीएसटीच्या नियमांमध्ये होणार बदल

Latest Marathi News Live Update : जेजुरीजवळ ट्रकच्या धडकेत तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी रुग्णालयात जाऊन जखमींची केली विचारपूस

Petrol-Diesel Price Today: अमेरिका-इराण संघर्षानंतर देशात इंधनाचे नवे दर जाहीर! 13 जुलैला पेट्रोल-डिझेल किती रुपयांना?

SCROLL FOR NEXT