Salman Khan Salman khan
मनोरंजन

Salman Khan: 'सलमानच्या चेहऱ्यापेक्षा तर...', साठीच्या जवळ आलेल्या भाईजानचा शर्टलेस फोटो व्हायरल होताच...

सलमान खानने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे ज्यामध्ये तो खूपच फिट दिसत आहे.

Aishwarya Musale

बॉलीवूड अभिनेता सलमान खान नेहमीच त्याच्या फिटनेसबाबत खूप जागरूक असतो. सलमान खान आपल्या शरीराची खूप काळजी घेतो. तसेच तो सोशल मीडियाच्या माध्यमातून तो अनेकदा आपल्या चाहत्यांना फिटनेस गोल देताना दिसतो.

अलीकडेच त्याने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली आहे ज्यामध्ये तो खूपच फिट दिसत आहे.

सलमान खान त्याच्या फिटनेसवर गांभीर्याने काम करत आहे आणि अनेकदा त्याचे जिममधील फोटो शेअर करत असतो. दबंग खानचे नवीनतम फोटो पाहिल्यानंतर, हे स्पष्ट होते की सध्या त्याचे वर्कआउट थांबवण्याचा त्याचा कोणताही विचार नाही. वयाच्या ५७ व्या वर्षी या प्रकारची शरीरयष्टी चाहत्यांना नक्कीच उत्तेजित करते. बुधवारी सलमानने इन्स्टाग्रामवर स्वतःचा एक नवीन फोटो शेअर केला, ज्यामध्ये तो स्विमिंग पूलमध्ये दिसत आहे.

मात्र, यामध्ये सलमानची कॅमेऱ्याकडे पाठ आहे आणि त्याचा चेहरा दिसत नाही. पण यात त्याची शानदार शरीरयष्टी नक्कीच दिसून येते. हे शेअर करत त्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, "बॅक टू लाइफ , बॅक टू रियलिटी."

सलमान खानच्या चाहत्यांच्या प्रतिक्रियाही समोर आल्या. एका चाहत्याने लिहिले की, "सलमानची बॅक पोज तुमच्या आवडत्या चेहऱ्यांपेक्षा जास्त प्रसिद्ध आहे." एका यूजरने कमेंटमध्ये लिहिले की, "क्या बॅक है (व्हॉट अ बॅक)." आणखी एका चाहत्याने कमेंट केली, "हॉलीवूडमध्ये अर्नोल्ड श्वार्झनेगर, ड्वेन जॉन्सन आणि सिल्वेस्टर स्टॅलोन आहेत... आमच्याकडे सलमान खान आहे."

गेल्या महिन्यात सलमानने जबरदस्त वर्कआउट केल्यानंतरचा एक फोटो शेअर केला होता. जिमच्या फोटोत तो घामाने भिजलेला होता. वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, या वर्षी जानेवारीत रिलीज झालेल्या शाहरुख खान स्टारर पठाणमध्ये कॅमिओ केल्यानंतर सलमानचा 'किसी का भाई किसी की जान' हा चित्रपट रिलीज झाला आहे. फरहाद सामजी दिग्दर्शित हा चित्रपट २१ एप्रिल रोजी प्रदर्शित झाला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gautami Patil Accident : अपघात गौतमी पाटीलच्या वाहनाचा, अन् भांडण रोहित पवार आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यात; दादांनी थेट आरे तुरेच्या भाषेत सुनावलं...

Shakti Cyclone : 'शक्ती' चक्रीवादळाचा महाराष्ट्राला किती धोका? IMDचे अपडेट आले समोर

Latest Marathi News Live Update : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली प्रमुख ओबीसी नेत्यांची बैठक

Nashik Crime : खुनांचा आकडा ४३ वर! नाशिकमध्ये विधीसंघर्षित बालकांकडून घातक हल्ले; पोलीस आणि गुन्हेगारांच्या हितसंबंधांवर प्रश्नचिन्ह

Anil Parab: मृत्यूनंतर खरंच बाळासाहेबांच्या हाताचे ठसे घेतले? अनिल परबांनी फोटो दाखवत कदमांची बुद्धी काढली

SCROLL FOR NEXT