salman iulia 
मनोरंजन

सलमान खान राबतोय शेतात, युलियासोबत भातलावणीचा व्हिडिओ केला शेअर..

दिपालीराणे-म्हात्रे

मुंबई- कोरोना व्हायरसच्या संकटामुळे बॉलीवूड इंडस्ट्रीमध्ये सिनेमांचं शूटींग थांबवण्यात आलं होतं. मात्र आता अनलॉकच्या दिशेने प्रवास सुरु असताना शूटींगसाठी काही अटी ठेवत परवानगी देण्यात आली आहे. तर एकीकडे सिनेमाचं शूटींग थांबल्यामुळे सलमान खान त्याच्या लॉकडाऊनमधला वेळ सत्कारणी लावत आहे. त्याने लॉकडाऊन सुरु झाल्यापासूनचे हे ४ महिने पनवेल येथील त्याच्या फार्महाऊसवरंच घालवले आहेत. आणि आता तर सलमान तिकडे शेती करण्यात व्यस्त झालाय.

सलमान खानने सोशल मिडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये सलमान, युलियासोबत अनेकजण दिसून येत आहेत. यात तो शेतात भातलावणी करत आहे. तसंच भातलावणी करताना तो चिखलात पूर्णपणे माखला देखील आहे. त्यानंतर तो शेतातीतंच स्वच्छ पाण्याने चिखलाचे हात पाय धुत आहे. सलमान हा व्हिडिओ पाहून तो शेतीकाम पूर्णपणे ऍन्जॉय करतोय असंच दिसतंय. व्हिडिओच्या शेवटी शेतात पूर्णपणे भातलावणी झाल्याचं देखील दाखवलंय. तसंच हा व्हिडिओ पोस्ट करताना सलमानने कॅप्शनही तसंच दिलंय. सलमानने लिहिलंय, संपूर्ण भातलावणी करुन झाली. 

सलमानने शेतात काम करताना व्हिडिओ शेअर करण्याची ही पहिलीच वेळ नाहीये तर याआधीही लॉकडाऊनमध्ये सलमानने शेतात काम करतानाचे व्हिडिओ शेअर केले आहेत. काही दिवसांपूर्वी सलमानने शेतातील चिखलात माखलेल्याचा फोटो पोस्ट करुन शेतक-यांचे आभार मानले होते तर एक दिवसापूर्वीच त्याने शेतातील चिखलामध्ये ट्रॅक्टर चालवतानाचा व्हिडिओ देखील शेअर केला होता. त्यानंतर हा भातलावणीचा व्हिडिओ शेअर करुन त्याने शेतातील काम पूर्ण झाल्याचं म्हटलं आहे. 

या व्हिडिओमध्ये सलमानसोबत त्याची कथित गर्लफ्रेंड युलिया वंतुर देखील भातलावणी करताना दिसतेय.  याआधीही जेव्हा सलमानने गावातील लोकांना धान्यवाटप केलं होतं तेव्हा त्याच्यासोबत युलिया दिसली होती. युलिया लॉकडाऊन झाल्यापासून सलमानसोबत त्याच्या फार्महाऊसवरंच आहे. या लॉकडाऊनमध्ये सलमानने पूर्णपणे निसर्गाचा आनंद घेतला आहे.      

salman khan shared rice plantation video on social media

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs PAK: वैभव सूर्यवंशीचा पुढचा टार्गेट पाकिस्तान? Asian Games मध्ये कधी होऊ शकतो IND vs PAK सामना, जाणून घ्या

Accident News: भीषण दुर्घटना! टाटा सुमोवर दरड कोसळली, १३ जणांचा जागीच मृत्यू, काही जखमी, मृतांमध्ये चिमुकल्याचाही समावेश

NEET Protest: विद्यार्थी आंदोलनातून CJP च्या उदयानं काँग्रेसला मागे टाकलं? विरोधकांचं गणित कसं बदललं? जाणून घ्या संपूर्ण क्रोनॉलॉजी...

Ashadhi Ekadashi 2026: साबुदाणा भिजवायला विसरलात? न भिजवता बनवा उपवासाचे क्रिस्पी मेदूवडे!

Latest Marathi News Live Update : २४ तासांच्या आत पुणे शहरात दोन गोळीबाराच्या घटना

SCROLL FOR NEXT