salman 
मनोरंजन

सलमान खान चक्क सांगतोय 'प्यार करोना'..नवीन गाणं ऐकलं का? 

सकाळ वृत्तसेवा

मुंबई- कोरोना व्हायरसबाबत लोकांमध्ये जनजागृती निर्माण करण्याासाठी सलमान खान वेगवेगळ्या प्रकारे प्रयत्न करताना दिसत आहे..याच पार्श्वभूमीवर सलमान आता नवं गाणं त्याच्या चाहत्यांसाठी घेऊन आला आहे..सलमानने नुकतंच कोरोना व्हायरसशी संबंधित एक गाणं लॉन्च केलंय ज्याचं नाव आहे 'प्यार करोना..' या गाण्याला सलमानने स्वतः आवाज दिला आहे..आणि या ऑडिओ रिलीजला म्युझिक प्लॅटफॉर्मवर रिलीज केलं गेलं आहे..हे गाणं सलमानच्या युट्युबवर व्हिडिओमध्ये देखील पाहायला मिळेल..

सलमानने सोशल मिडीया प्लॅटफॉर्मवर हे गाणं रिलीज करत एक मजेदार पोस्ट देखील लिहीली आहे..सलमानने हे गाणं शेअर करत लिहीलं आहे, 'इमोशनली पास और फिजीकली दूर रहो ना, प्यार करोना..'  हे गाणं सलमान खान आणि हुसैन दलाल यांनी मिळून लिहीलेलं आहे तर संगीत साजिद-वाजिद यांनी दिलं आहे..

या गाण्यात सलमानने त्याच्या चाहत्यांना हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे की, कोरोनाच्या या काळात सगळे घरात बसून काय काय करु शकतात? आणि त्यांचा हा वेळ कसा वेगळ्या पद्धतीने खास बनवू शकतात..सोबतंच त्याने त्याच्या चाहत्यांना हा वेळ त्यांच्या कुटूंबासोबत घालवण्याचा सल्लाही दिलाय..

काही दिवसांपूर्वी सलमानने एक व्हिडिओ पोस्ट करुन लॉकडाऊनचं पालन न करणा-यांना चांगलीच चपराक लगावली होती..इतकंच नाही तर धर्माच्या नावावर घराबाहेर पडणा-यांनाही त्याने सुनावले होते.. सलमानने या दरम्यान बंद असलेल्या सिनेइंडस्ट्रीतील २५ हजार कामगारांना आर्थिक मदत करणार असल्याचं जाहीर केलं होतं..इतकंच नाही तर तो या संकटाचा सामना करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे मदतीचा हात पुढे करत आहे..

salman khan sings a song pyaar karona trying to aware people about coronavirus  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Miraj Shinde vs Thackeray Group : मिरजेत ठाकरे-शिंदे गटात कमानी ‘युद्ध’; दिशा सालियन प्रकरणाला ‘गद्दारी’वरुन प्रत्‍युत्तर, पोलिस परवानगीने आश्चर्य

Kolhapur Ganesh Idol Collapse : कोल्हापुरात मानाची २१ फुटी गणेशमुर्ती कोसळली, वीजवाहिनीचा धक्का लागला अन् गोखले कॉलेज चौकातील घटना

Bomb Detection Squad Miraj : मिरजेत गणेश विसर्जन मिरवणुकीवेळी अचानक बॉम्ब शोधक पथक, श्वानपथकाकडून मिरवणूक मार्गाची तपासणी; शहरातील प्रमुख मार्ग बंद

Maharashtra Ganesh Visarjan Live: जवखेडा ठोंबरे येथे शेतकरी संवाद सभा

Bhiwandi News: माझ्या मुलाला फाशी द्या! भिवंडीतील हाय-प्रोफाईल सामूहिक अत्याचाराच्या प्रकरणात आईची मागणी

SCROLL FOR NEXT