Salman Khan, Shahrukh Khan Google
मनोरंजन

Shahrukh Khan च्या 'या' एका गुणावर बॉलीवूडचा भाईजान भलताच फिदा, सर्वांसमक्ष कबुली देत म्हणाला...

सध्या सोशल मीडियावर सलमान आणि शाहरुखचा एक व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे ज्यात सलमाननं शाहरुखच्या गुणांची जोरदार प्रशंसा केली आहे.

प्रणाली मोरे

Salman Khan Spaks about Shahrukh Khan: बॉलीवूडमध्ये सलमान आणि शाहरुखचं स्वतःचं असं वेगळं प्रस्थ आहे. एकीकडे किंग खानचा उदो उदो बॉलीवूडमध्ये होताना दिसत असला तरी दुसरीकडे बॉलीवूडच्या दबंग खान पुढे भलेभले नमताना दिसतात.

आपल्या सगळ्यांना शाहरुख-सलमानमधील मैत्री देखील माहित आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ती तशीच आहे मध्यंतरी दोघांमध्ये बिनसलं होतं पण दोघांनी काही काळानंतर एकमेकांतला रुसवा-फुगवा विसरुन पुन्हा मैत्रीचे हात एकमेकांसाठी पुढे केलेले देखील आपण पाहिले असतील. (Salman Khan speaks about shahrukh khan special quality..video viral)

सलमान आणि शाहरुख आजही तितकेच घट्ट मित्र आहेत. आर्यन खान केस प्रकरणात सलमान खानने अनेकदा शाहरुखची भेट घेण्यासाठी 'मन्नत' वर फेऱ्या मारल्याचं आपल्या सगळ्यांच्याच पाहण्यात आलं आहे. असो..आता शाहरुख- सलमानचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्याची जोरदार चर्चा सुरु झाली आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओत सलमान खान बोलताना दिसत आहे की,''शाहरुख मध्ये बरेच गुण आहेत पण त्यातील एका गुणावर मी स्वतः देखील फिदा आहे. तो ज्या पद्धतीनं रोमान्स करतो सिनेमात,ते तसे लूक देणं कठीणच. आजही त्याच्यावर तरुण मुली फिदा होतात ते याच कारणानं''.

आता हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर बरेच नेटकरी प्रतिक्रिया नोंदवताना दिसत आहेत. एकानं तर चक्क लिहिलं आहे की,'शाहरुखच्या रोमॅंटिक लूकवर मुलीच नाहीत मुलं देखील फिदा आहेत..'.

शाहरुखचा 'पठाण' लवकरच भेटीस येत आहे. तेव्हा चार वर्षांनी मोठ्या पडद्यावर शाहरुखचं स्वागत प्रेक्षक कसे करतायत हे पाहणं उत्सुकतेचं ठरेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: एका षटकाने इंग्लंडचा आत्मविश्वास वाढला! आपलाच गोलंदाज भारताचा वैरी ठरला; स्मिथपाठोपाठ हॅरी ब्रूकचे शतक

'राणादा' वारकऱ्यांसोबत दंग, स्वत: हाताने केलं अन्नदान, हार्दिक जोशीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

Latest Maharashtra News Updates : : खरीप हंगामात डीएपी या रासायनिक खताची टंचाई; पावसामुळे मशागतीची कामे ठप्प

Uddhav Thackeray Video: उद्धव ठाकरेंचा जुना व्हिडीओ व्हायरल; 'जय गुजरात'चा दिला होता नारा

Sushil Kedia Tweet: देवेंद्रजी आणि अमितजी मला वाचवा! माझ्याविरोधात मोठी मोहीम...; सुशील केडियांची संरक्षणासाठी धाव

SCROLL FOR NEXT