Salman Khan New Bald Look: SAKAL
मनोरंजन

Salman Khan New Look: सलमान खानचा 'गजनी' लूक व्हायरल! नेटकरी म्हणाले, 'तेरे नाम चा सिक्वेल की..'

Vaishali Patil

 Salman Khan New Bald Look: बॉलिवूडचा भाईजान म्हणुन ओळखला जाणारा सलमान खान हा नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतो. त्याने नुकतीच बिग बॉसच्या ओटीटीच्या दुसऱ्या सिझनची होस्टिंग केली.

या सोमवारी या शोचा फिनाले झाला. त्यानंतर तो पुन्हा त्याच्या चित्रपटाच्या शुटिंगसाठी परतला आहे. त्यातच आता सलमानचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यात तो वेगळ्याच लुकमध्ये दिसतोय.

सलमान खान रविवार, 20 ऑगस्ट रोजी मुंबईतील एका पार्टीत बॉलिवूडचा भाईजान त्याच्या नव्या बाल्ड लुकमध्ये दिसला. पण ज्याला पाहून त्याचे चाहते आणि नेटकरी सगळेच आश्चर्यचकित झाले. इतकच नाही तर त्याचा हा लुक पाहिल्यानंतर काहींनी त्याची खिल्लीही उडवली आहे. सलमान खान 'तेरे नाम 2' ची तयारी करत असल्याच्या चर्चांना यानंतर उधाण आले आहे.

त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये सलमान खान त्याच्या कारमधून उतरताना दिसत आहे. या पार्टीसाठी सलमानने काळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला होता.

सलमान खान हा नेहमीच अशी काही तरी वेगळ्या आणि हटके स्टाईलसाठी ओळखला जातो. त्याच्या कोणत्याही चित्रपटातील भुमिका असो त्याचा लुक व्हायरल होतोच. त्याची 'तेरे नाम'ची हेअरस्टाईल आजही चर्चेत आहे कारण त्यावेळी त्याची क्रेझ खुपच होती. आता तो बाल्ड लूकमध्ये दिसला आहे. यात सलमान खान पूर्णपणे वेगळा दिसत आहे.

आता त्याचा व्हिडिओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या कल्पना करायला सुरुवात केली. सलमान आता कोणता सिनेमा शुट करणार याबद्दलही नेटकऱ्यांनी भन्नाट कमेंट केल्या आहेत. काहींना 'तेरे नाम' तर काहींना 'गजनी'चा लुक आठवला आहे.

व्हिडिओवर कमेंट करतांना एका चाहत्याने लिहिले, "तेरे नाम 2 स्क्रिप्ट तयार आहे." तर दुसऱ्याने लिहिले, "कदाचित तेरे नाम 2 येत आहे." दुसऱ्याने लिहिले, "सलमान भाई आता गजनी2 करणार."

सलमानच्या चित्रपटांव्यतिरिक्त आणखी काही भन्नाट कमेंट त्याच्या लुकला आल्या आहेत. एकाने लिहिले की ' हेयर ट्रांसप्लांट डन' . तर एकानं लिहिलयं की, 'सलमान खान आता विचार करत असावा की असा लूक केल्यानंतर बिश्नोई गँगचे लोक त्याला ओळखू शकणार नाहीत.' एकानं लिहिलं, 'अखेर सलमान खान म्हातारा दिसतोय.' तर काहींनी तो जवानचं प्रमोशन करत असावा असं लिहिलयं.

सध्या सलमान खानचा 'टायगर 3' च्या रिलीजसाठी सज्ज आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Heritage status: अभिमानाची बाब! शिवरायांच्या १२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या यादीत समावेश

खरीप हंगामात ८१,००० शेतकऱ्यांना ११४० कोटींचे पीककर्ज! ६३ हजार ८४९ शेतकऱ्यांच्या १०३० कोटी रुपयांच्या पीककर्जाचे बॅंकांनी केले नवे-जुने

Latest Marathi News Updates: 'सीएम'पदासाठी भाजपात पक्ष विलिन करण्याची शिंदेंची तयारी - संजय राऊतांचा टोला!

IND vs ENG 3rd Test: रिषभ पंतने २५ मिनिटं नेट्समध्ये फलंदाजी केली, पण...! जाणून घ्या महत्त्वाचे अपडेट्स, Video

Pune ISIS sleeper cell: मोठी बातमी! पुणे ‘इसीस स्लीपर सेल मॉड्युल’ प्रकरणी अकरावी अटक; तीन लाखांचा होता इनाम!

SCROLL FOR NEXT