Salman Khan Sakal
मनोरंजन

Salman Khan: दोघा भावांचं तुटलं लग्न म्हणुन तर...सलमानने अरबाज आणि सोहेलची उडवली खिल्ली

अलीकडेच प्रदर्शित झालेल्या 'किसी का भाई किसी की जान' या चित्रपटामुळे सलमान खान सध्या चर्चेत आहे.

Aishwarya Musale

अलीकडेच प्रदर्शित झालेल्या 'किसी का भाई किसी की जान' या चित्रपटामुळे सलमान खान सध्या चर्चेत आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. भाईजान अनेक दिवसांपासून या चित्रपटाचे प्रमोशन करत आहे.

याच अनुषंगाने तो नुकताच 'द कपिल शर्मा' शोमध्येही दिसला होता. यावेळी मंचावर सलमान खानने त्याचे दोन्ही भाऊ अरबाज खान आणि सोहेल खान यांच्या अयशस्वी लग्नाची खिल्ली उडवली.

अरबाज खान आणि सोहेल खान या दोघांचाही सध्या घटस्फोट झाला आहे. अरबाजने मलायका अरोरासोबत लग्न केले, तर सोहेलची पत्नी 'द फॅब्युलस लाइव्ह्स ऑफ बॉलीवूड वाइव्हज' फेम सीमा सजदेह होती. या दोन भावांचे लग्न यशस्वी झाले आणि आता घटस्फोटानंतर ते एकटे आयुष्य जगत आहेत.

सलमान नुकताच ‘द कपिल शर्मा शो’ या कॉमेडी शोमध्ये पोहचला होता. यावेळी सलमानच्या रिल आणि रिअल लाईफमधील या योगायोगाबद्दल कपिलने मजेशीर प्रश्न विचारला.

“तुझ्याकडे सोहैल आणि अरबाजने अशी कधी तक्रार केली का की तू आमचं कधीच ऐकत नाहीस, पण आता तो तुमचे नाही तर (चित्रपटातील भावंडांचं) ऐकतोय.” त्यावर सलमान म्हणतो, “माझं त्या दोघांनी कधीच ऐकलं नाही. पण आता ते माझे ऐकू लागले आहेत.” सलमानचा हा मजेदार व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

अरबाज खानने 1998 मध्ये मलायका अरोरासोबत लग्न केले आणि 2017 मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. त्यांना अरहान खान हा मुलगा आहे. दुसरीकडे, सोहेल खान आणि सीमा सजदेह यांचे 1998 मध्ये लग्न झाले होते आणि गेल्या वर्षी घटस्फोटानंतर दोघेही वेगळे झाले.

सलमान खानचा 'किसी का भाई किसी की जान' हा चित्रपट 21 एप्रिल रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटात सलमान खान व्यतिरिक्त पूजा हेगडे, व्यंकटेश, जगपती बाबू, भूमिका चावला, पलक तिवारी, शहनाज गिल, सिद्धार्थ निगम, राघव जुयाल यांसारखे स्टार्स दिसणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Rain Update: पुण्यात पावसाचा हाहाकार! एकता नगरमध्ये पाणी शिरलं, खडकवासल्यातून विसर्ग वाढला

Kolhapur Rain Update : पंचगंगा नदीने इशारा पातळी गाठली, जिल्ह्यातील ४१ मार्गांवर पाणी; राधानगरी धरणाचे ५ दरवाजे बंद, असा आहे पावसाचा अंदाज?

Pune-Mumbai Train Cancelled : पुणे- मुंबई प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी ! सर्व रेल्वे गाड्या रद्द, पाहा संपूर्ण यादी

Post Office Scheme: रोज फक्त 50 रुपये गुंतवा आणि मिळवा तब्बल 35 लाखांचा फंड; काय आहे योजना?

Rain-Maharashtra Latest live news update: गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग, नाशिकमध्ये पूरस्थितीची शक्यता

SCROLL FOR NEXT