salman khan tiger 3 mumbai first show on early morning know the details katrina kaif SAKAL
मनोरंजन

Tiger 3: सलमानचा टायगर 3 पाहून साजरी करा 'दिवाळी पहाट', मुंबईत पहिला शो सकाळी...

मुंबईत पहाटे सलमान खानच्या टायगर 3 चा पहिला शो सुरु होणार आहे, वाचा सविस्तर

Devendra Jadhav

Tiger 3 Early Morning Show News: सलमान खानच्या आगामी टायगर 3 सिनेमाची सर्वांना उत्सुकता आहे. टायगर 3 च्या रिलीजला अवघे काहीच दिवस बाकी असताना फॅन्सना सिनेमा पाहण्याची उत्सुकता शिगेला आहे.

सलमान खान - कतरिना कैफ स्टारर टायगर 3 पाहण्यासाठी लोकं आतापासुनच सज्ज आहेत. अशातच टायगर 3 च्या चाहत्यांसाठी खुशखबर. मुंबईत टायगर 3 चा भल्या पहाटे शो लावण्यात येणार आहे. त्यामुळे टायगर पाहून लोकं दिवाळी पहाट साजरी करणार अशी शक्यता आहे.

(salman khan tiger 3 mumbai first show on early morning know the details katrina kaif)

टायगर 3 दिवाळीच्या पहिल्याच दिवशी म्हणजेच रविवारी, 12 नोव्हेंबर रोजी रिलीज होणार आहे! निर्माते यशराज फिल्मने माहिती दिली की, ते रिलीजच्या तारखेला देशभरात सकाळी ७ वाजल्यापासून चित्रपटाचे प्रदर्शन सुरू करतील!

तसेच, YRF 5 नोव्हेंबरपासून भारतात टायगर 3 चे आगाऊ बुकिंग सुरू करणार आहे! हा चित्रपट दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये प्रदर्शित होत आहे, त्यामुळे चित्रपटगृहांनी टायगर 3 च्या स्वागताची तयारी लवकर सुरुवात करावी विनंती केली आहे.

YRF स्पाय युनिव्हर्सचे चाहते स्पॉइलर टाळण्यासाठी टायगर 3 चा पहाटेच्या शोला नक्की गर्दी करतील यात शंका नाही.

टायगर 3 हा ब्लॉकबस्टर YRF स्पाय युनिव्हर्स मधील 5 वा चित्रपट आहे जो एक था टायगर, टायगर जिंदा है, वॉर आणि पठाण या घटनांची पुढील मालिका आहे. टायगर 3 चे दिग्दर्शन मनीष शर्मा यांनी केले आहे.

टायगर 3 प्रेक्षकांसाठी पर्वणी असणार यात शंका नाही. YRF टायगर 3 हा YRF स्पाय युनिव्हर्स आजवरचा सर्वात भव्यदिव्य सिनेमा असणार यात शंका नाहीय.

टायगर 3 हिंदीसोबतच तमिळ डब आणि तेलुगु डब आवृत्त्यांमध्ये प्रदर्शित होईल. टायगर 3 सिनेमा १२ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT