मुंबई- बॉलीवूड भाईजान सलमान खानचे चाहते त्याच्या 'राधे युअर मोस्ट भाई' या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत. हा सिनेमा या वर्षीच रिलीज होणार होता मात्र कोरोना व्हायरसच्या कारणामुळे झालेल्या लॉकडाऊनमुळे शूटींगमध्ये अडचणी निर्माण झाल्या. सलमान खानने उरलेली शूटींग पुर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे आणि पोस्ट प्रोडक्शनचं काम जोरदार सुरु आहे. आता सलमान खानने चाहत्यांना एक धमाकेदार सरप्राईज दिलं आहे ज्याचा खुलासा आयुष शर्माने केला आहे.
अभिनेता सलमान खानने गुरचुप त्याच्या आगामी अंतिम: द फायनल ट्रुथची शूटींग सुरु केली आहे. आयुश शर्माने सलमान खानचा या सिनेमातील फर्स्ट लूक रिव्हिल केला आहे. आयुषने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओला कॅप्शन देताना त्याने लिहिलंय, अंतिम सुरु झालं आहे. या व्हिडिओमध्ये सलमान खान काळी पगडी आणि खालसा लॉकेट घालून भाजी मंडईमधून जाताना दिसतोय.
सलमान खान अंतिम सिनेमात एका सरदार पोलिसाची भूमिका साकारताना दिसणार आहे. या सिनेमाचं शूटींग १६ नोव्हेंबरला पुण्यात सुरु झाली होती. मात्र तेव्हा केवळ आयुष शूटींग करत होता. सलमान खान नंतर सिनेमाच्या युनिटसोबत जॉईन झाला. आयुषने या गँगस्टर ड्रामाची सुरुवात नोव्हेंबरमध्ये सुरु केली होती. आणि डिसेंबरमध्ये तो सलमान खानसोबत त्याचे सीन्स शूट करणार आहेत. सलमान खान अंतिम सिनेमाच्या शूटींगमध्ये केवळ बर्थडेच्या दिवशी ब्रेक घेणार आहे त्यानंतर आयुष शर्माची शूटींग संपल्यावरच थांबेल.
या सिनेमाची खासियत म्हणजे हा सिनेमा मुळशी पॅटर्न या मराठी सिनेमाचा हिंदी रिमेक आहे आणि याचं दिग्दर्शम महेश मांजरेकर करत आहेत.
salman khan upcoming film antim the final truth aayush sharma shares the first look
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.