Salman Khan Video: Esakal
मनोरंजन

Salman Khan Video: भाईजानचा थाटच न्यारा! गळ्यात भगवं उपरणं टाकून पोहचला CM शिंदेंच्या घरी गणरायाच्या दर्शनाला

Vaishali Patil

Salman Khan Video: देशभरात गणेश चतुर्थीचा उत्सव साजरा केला जातोय. सर्व सामान्यापासूनच तर बड्या कलाकारांपर्यंत सगळेच बाप्पाच्या भक्तीत लीन झालेले दिसताय.

अनेक मोठ मोठ्या कलाकारांनी आपल्या घरी गणेशोत्सवानिमित्त अनेक कार्यक्रमाचे आयोजन केले. त्यातच नुकतच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या घरी बॉलीवूड आणि टीव्ही इंडस्ट्रीतील अनेक स्टार्स गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी पोहोचले.

यावेळी शाहरुखसोबतच बरेच कलाकार दिसले. मात्र सर्वांचे लक्ष वेधुन घेतले ते बॉलिवूडचा भाईजान सलमान खानने. सध्या सोशल मीडियावर सलमान खानचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

यावेळी सलमान खान त्याची बहीण अर्पिता आणि मेहुणा आयुष शर्मा हे देखील त्याच्यासोबत दिसले. याप्रसंगी सलमान खान मरून रंगाच्या कुर्त्यामध्ये दिसला.

अर्पिता लाल रंगाच्या सूटमध्ये दिसली. तर आयुष शर्मा ब्लॅक लूकमध्ये शोभून दिसत होता. यावेळी सीएम शिंदे यांच्याकडून सलमानला गणरायाची मुर्ती भेट देण्यात आली. सलमानच्या गळ्यातील भगव्या रंगाच्या उपरण्याने मात्र सर्वाचं लक्ष वेधलं.

सलमान खान आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे खुप चांगले सबंधं आहेत. यापुर्वी देखील ते बऱ्याचदा एकत्र दिसले आहेत. सलमानची बहीण अर्पिताच्या घरी हजेरी लावत सीएम एकनाथ शिंदेनी बाप्पाचे दर्शन घेतले होते.

त्याचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. आता सलमानने देखील त्यांच्या घरी जात बाप्पाचे दर्शन घेतले. सध्या नेटकरी या व्हिडिओवर कमेंट करत आहे. काही सलमानचं कौतुक करत आहेत.तर काही त्याला ट्रोल करत आहे.

सलमान खानच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर तो शेवटचा 'किसी का भाई किसी की जान' या चित्रपटात दिसला होता. आता तो लवकरच कतरिना कैफसोबत 'टायगर 3' या चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट दिवाळीला रिलीज होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

What is Rudali Tradition? : देवेंद्र फडणवीसांकडून उद्धव ठाकरेंना 'रुदाली'ची उपमा; पण रुदाली म्हणजे कोण? काय आहे ही विचित्र परंपरा?

Thane News: शिवशाहीची धोकादायक अवस्था, व्हायरल व्हिडीओनंतर प्रशासनाला जाग, अधिकाऱ्यांची सारवासारव

Adani Group Investment : दिवाळखोरीतून जाणाऱ्या ‘या’ कंपनीवर अदानी ग्रुप तब्बल १२५००००००००००० रुपये लावण्यास तयार!

Dhule News : धुळे जिल्हा बँकेचा 'कमाल': पीककर्ज वाटपात उद्दिष्ट ओलांडले, राष्ट्रीयीकृत बँका पिछाडीवर

Vaibhav Suryavanshi इंग्लंडमध्ये कसोटी सामना पाहून भारावला, गिलबद्दलही बोलला; लक्ष्मणमुळे U19 टीम इंडियाला मिळाला स्पेशल अनुभव

SCROLL FOR NEXT