Salman Khan was seated next to Cristiano Ronaldo and Georgina Rodríguez at a boxing match in Riyadh SAKAL
मनोरंजन

Ronaldo - Salman Khan: अरेच्चा! सलमान खान - रोनाल्डो एकत्र, हे ठरलं खास कारण

बॉलिवुडचा सुपरस्टार आणि फुटबॉलचा बादशाह रोनाल्डो एकत्र आलेत, कारण माहितीये?

Devendra Jadhav

Salman Khan - Ronaldo News: सलमान खान आणि रोनाल्डो एकाच मंचावर एकत्र आलेत. दोघांच्या एकत्र येण्याने जागतिक स्तरावर त्यांच्या फॅन्सना आनंद झालाय.

सलमान खान हा बॉलिवुडचा तर रोनाल्डो हा फुटबॉलचा सुपरस्टार, असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. हे दोघे अगदी एकमेकांच्या बाजुला बसले होते. काय आहे कारण? आम्ही तुम्हाला सांगतो.

(Salman Khan was seated next to Cristiano Ronaldo and Georgina in Riyadh)

म्हणुन रोनाल्डो आणि सलमान खान आले एकत्र

रोनाल्डो आणि बॉलीवूड स्टार सलमान खान अलीकडेच रियाधमध्ये एमएमए सामन्यादरम्यान एकमेकांच्या शेजारी बसलेले दिसले. या दोघांना एकत्र पाहताच त्यांच्या चाहत्यांना आनंद झाला.

रोनाल्डो त्याची गर्लफ्रेंड जॉर्जिना रॉड्रिग्जसोबत होता, तर सलमान त्यांच्या शेजारी एकटाच बसला होता. रोनाल्डो आणि सलमानचे फोटो आणि व्हिडिओ सोशल व्हायरल होत आहेत. दोघे एकमेकांशी बोलले की नाहीत हे मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे.

अब्दू आणि सलमान खानची सुद्धा झाली भेट

अब्दू आणि सलमान खान सुद्धा रियाध सौदी अरेबिया मध्ये एकत्र भेटले. अब्दू आणि सलमान खानचं नातं सर्वांना माहितच आहे. बिग बॉस 16 मध्ये अब्दू आणि सलमान खान यांचं खास नातं आपण पाहिलंच.

या दोघांची सुद्धा सौदी अरेबियामध्ये भेट झाली. अब्दूने भाईजानसोबत खास फोटोशुट केलं. दो

सलमान खानच्या टायगर 3 ची उत्सुकता

YRF स्पाय युनिव्हर्स मधील टायगर 3 ची निर्मिती आदित्य चोप्रा यांनी केली आहे आणि मनीष शर्मा यांनी दिग्दर्शन केले आहे. सलमान खान आणि कतरिना कैफ या सिनेमात प्रमुख भुमिकेत आहेत

टायगर 3 सिनेमा या दिवाळीत, 12 नोव्हेंबर, रविवारी हिंदी, तमिळ आणि तेलुगू मध्ये रिलीज होणार आहे!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bank Fraud: मॅनेजरने पत्नी आणि मेव्हण्यासोबत उडवले ५९० कोटी; देशातील मोठ्या बँकेतून पैसे कसे गायब झाले?

Latest Marathi News Live Update : चिपळूणमध्ये आजपासून कोकण विभागीय काँग्रेसचे प्रशिक्षण शिबिर

Somnath Suryawanshi Case: सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणाची सुनावणी पुढे ढकलली

What is the E20 Petrol Mandate 2026? पेट्रोलचे नियम बदलणार! तुमच्या गाडीत 'हे' इंधन भरण्यापूर्वी ही बातमी नक्की वाचा, अन्यथा...

श्रीदेवींच्या निधनामागे स्ट्रिक्ट डायट कारणीभूत? बोनी कपूरांचा खुलासा, म्हणाले...'ती मीठचं खात नव्हती'

SCROLL FOR NEXT