salman
salman 
मनोरंजन

भाईजानच्या चाहत्यांसाठी स्पेशल ईद गिफ्ट, करणार म्युझिक व्हिडिओ लॉंच

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : दरवर्षी ईदच्या ऐनमोक्यावर सलमान खानचे चित्रपट बॉक्सऑफिसवर दाखल होतात. ईद आणि सलमान खानचे चित्रपट हे फार जुनं समीकरण आहे. 2009मध्ये सलमानने 'वॉन्टेड' हा त्याचा चित्रपट ईदच्यानिमित्ताने प्रदर्शित केला. आणि या चित्रपटापासूनच त्याने ही परंपरा सुरुच ठेवली. ईदला सल्लुमियॉं आपल्यासाठी खास चित्रपट घेऊन येणार म्हणून प्रेक्षकही फार उत्सुक असतात. तिकीटबारीवर तर सलमानचा चित्रपट पाहण्यासाठी झुंबड उडते. सलमानचा चाहतावर्ग तर त्याचे चित्रपट पाहण्यासाठी थिएटरात हमखास हजेरी लावतो. मात्र यंदाची ईद भाईजान आणि त्याच्या चाहत्यांसाठी फिकी आहे. 

कोरोना विषाणूमुळे चित्रपटगृह पूर्णपणे बंद आहेत. यंदाच्या ईदनिमित्त सलमान त्याचा आगामी 'राधे' हा चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार होता. मात्र आता तसे काहीच घडणार नाही. त्यामुळे सलमानच्या चाहत्यांमध्ये ही निराशा आहे. हीच निराशा दूर करण्यासाठी भाईजानने एक नवी युक्ती लढवली आहे. एक नवा म्युझिक व्हिडिओ तो खास प्रेक्षकांसाठी लॉंच करणार आहे. चित्रपटामधून प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर हसू आणणं सध्याच्या परिस्थितीमध्ये सलमानला शक्य नाही.

म्हणून त्याने एक म्युझिक व्हिडिओ तयार केला आहे. तो हा म्युझिक व्हिडिओ त्याच्या युट्युब चॅनलवर प्रदर्शित करणार आहे. लॉकडाऊनमध्ये सलमानने स्वतःच युट्युब चॅनल लॉंच केलं. आणि या चॅनलच्या माध्यमातून त्याने प्यार करोना, तेरे बिना ही गाणी लॉंच देखील केली. त्याच्या पनवेल येथील फार्महाऊसवर त्याने त्याच्या गाण्याचं चित्रीकरण केलं. त्याच्या या दोन्ही गाण्यांना प्रेक्षकांची प्रचंड प्रतिसाद केला.

लाखोंनी व्ह्युज त्याच्या या गाण्यांना मिळाले. लॉकडाऊनमध्ये कोणत्या ना कोणत्या माध्यमातून तो प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. आजवर सलमानचे दबंग, बॉडीगार्ड, एक था टायगर, बजरंगी भाईजान, सुलतान, ट्युबलाईट, रेस, भारत यांसारखे चित्रपट ईदच्या ऐनमोक्यावर प्रदर्शित झाले. यातील बऱ्याच चित्रपटांनी बॉक्सऑफिसवर बक्कळ कमाई केली. 2009पासून सलमानने ईदला आपला चित्रपट प्रदर्शित करायचा ही परंपरा सुरु केली आणि आता कोरोनामुळे यामध्ये खंड पडला आहे. संपूर्ण परिस्थिती पूर्वपदावर आल्यानंतर राधे चित्रपटगृहांत नक्कीच दाखल होईल.   

salman khan will launch a special song on eid

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Datta Bharane: 'तो कार्यकर्ता नव्हता, तर...'; शिवीगाळाच्या व्हिडिओवर दत्ता भरणे यांनी दिलं स्पष्टीकरण

ठाकरे गट विरुद्ध शिंदे गटात राडा, हातकणंगलेत मतदान केंद्रावर कार्यकर्ते भिडले! नेमकं काय घडलं?

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : सांगोल्यात दोन गटांमध्ये हाणामारी, शेकाप कार्यकर्ते अन् शिवसैनिक भिडले

Latest Marathi News Live Update: मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत 20 मे पर्यंत वाढ

Kanhaiya Kumar: कन्हैया कुमार यांच्याकडे एवढी आहे संपत्ती; दिल्लीच्या उमेदवारांमध्ये मनोज तिवारी सर्वात श्रीमंत

SCROLL FOR NEXT