Salman Khan With his Personal Bodyguard Shera Instagram
मनोरंजन

Salman Khan: जेव्हा भाईजानचा विषय निघतो तेव्हा वाघाचं काळीज घेऊन फिरणारा बॉडीगार्ड शेराही होतो भावूक..म्हणाला,'मालक..'

सलमाननं शेराला वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारी पोस्ट केल्यानंतर व्हायरल होतंय ते बॉडीगार्ड शेराचं उत्तर.

प्रणाली मोरे

Salman Khan आपल्या जवळच्या लोकांसाठी जे शक्य होईल तेवढी मदत करतो. अनेकदा तर त्याला ओळखीचीही गरज लागत नाही,तो सगळ्या गरजूंना मदत करण्याचा प्रयत्न करताना दिसते. त्यामुळेच तर त्याचा चाहतावर्ग मोठा आहे. त्याचा बॉडीगार्ड शेरा देखील त्याला देवापेक्षा कमी मानत नाही. हेच कारण आहे की वेळोवेळी सलमानविषयी तो आपलं प्रेम व्यक्त करताना दिसतो.

काही दिवसांपूर्वीच भाईजाननं आपला बॉडीगार्ड शेराला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. सलमाननं शेरासोबतचा फोटो शेअर केला ज्यात शेरानं सलमानच्या खांद्यावर हात ठेवला आहे. या फोटोसोबत सलमाननं जे सुंदर कॅप्शन लिहिलं आहे त्याचं उत्तरही तितकंच भावूक आहे.(Salman Khan wishes bodyguard shera and his emotional reply viral)

सलमान खानकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा स्विकारल्यानंतर शेरानं त्याच्यासाठी खूप छान मेसेज लिहिला आहे. त्यानं इन्स्टाग्रामवर आलेल्या सलमानच्या मेसेजला रिप्लाय देत लिहिलं आहे, ''आभारी आहे मालक,तुमच्या त्या सगळ्या प्रेमासाठी आणि आशीर्वादासाठी जे वेळोवेळी तुम्ही मला दिलात''.

शेराला फक्त सलमाननेच नाही तर संगीता बिजलानी आणि इतरही अन्य सेलिब्रिटींनी शुभेच्छा दिल्या आहेत.शेरा आणि सलमान मधलं बॉन्डिंग पाहून चाहता वर्ग खूश झाला आहे.

एका नेटकऱ्यानं लिहिलं आहे की,'सलमाननं शेराला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्याचे आभारही मानले, खरंच छान'. तर आणखी एकानं लिहिलं आहे ,'हॅप्पी बर्थ डे शेरा भाई कारण तू भाईजानचं संरक्षण करतोस. त्यासाठी धन्यवाद'.

माहितीसाठी सांगतो की शेरा गेल्या २८ वर्षांपासून सलमान खानचा पर्सनल बॉडीगार्ड आहे आणि त्याचं रक्षण करतोय. सलमानही त्याला फक्त बॉडीगार्ड नाही तर आपला भाऊ,मित्र मानतो.

शेरा सलमानचा खूप सम्मान करतो. सोशल मीडियावर सलमान आणि शेराचे एकत्र असे खूप फोटो पहायला मिळतील आणि दोघेही अनेकदा एकमेकांवर असा प्रेमाचा वर्षाव करताना दिसतात.

सलमानच्या वर्कफ्रंटविषयी बोलायचं झालं तर त्याचा 'किसी का भाई किसी की जान' सिनेमा नुकताच रिलीज झाला. सिनेमानं अॅव्हरेज बिझनेस केला. सलमानचा आगामी सिनेमा 'टायगर ३' लवकरच आपल्या भेटीस येत आहे. नोव्हेंबर मध्ये 'टायगर ३' रिलीज होणार असं बोललं जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

FSSAI च्या कारवाईचा दणका! Dabur नंतर Zandu सह ५ कंपन्यांवर कडक कारवाई; कारण काय?

Pimpalwandi News : पिंपळवंडी ग्रामस्थांचा पोलीस अधीक्षक गिल यांच्याकडे संतप्त सवाल; पिंपळवंडी येथील पोलीस आऊट पोस्ट दहा वर्षापासून बंद

Shubman Gill: "तो खेळाडू भारतासाठी दीर्घकाळ खेळेल!", श्रीलंकेविरुद्धच्या विजयानंतर गिलची मोठी भविष्यवाणी!

Marathi News Live Updates : 'आप' नेते सत्येंद्र जैन आणि इतर ४ आरोपींना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

Sangola News : सांगोल्यातील विविध पक्षातील कार्यकर्त्यांनी मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत केला पक्षप्रवेश

SCROLL FOR NEXT