Salman Khan Viral Photo with His Mother Salma Khan Google
मनोरंजन

जेव्हा सलमान एखाद्या लहान मुलाप्रमाणे आईच्या मांडीवर विसावतो तेव्हा..

दबंग खानचा आईसोबतचा तो फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

प्रणाली मोरे

बॉलीवूड अभिनेता सलमान खान (Salman Khan) हा सुपरस्टार असण्यासोबतच तो कुटुंबवत्सल म्हणूनही ओळखला जातो. आपल्या सगळ्यांनाच माहित आहे की सलमानचं त्याच्या कुटुंबावर खूप प्रेम आहे. तो आपल्या शूटिंगमधून वेळ काढत आपल्या कुटुंबासोबत सुट्टी एन्जॉय करताना अनेकदा दिसतो. सोशल मीडियावर तो नेहमी आपल्या कुटुंबासोबतचे व्हिडीओ शेअर करीत असतो. नुकताच सलमानने आपली आई सलमा खान सोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोत दिसत आहे की तो आपल्या आईसोबत काही आनंदाचे क्षण घालवताना दिसत आहे. (Salman Khan Viral Photo with His Mother Salma Khan)

Salman Khan with Mother Salma Khan

सलमान खानने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर आपली आई सलमा खानसोबत एक सुंदर सेल्फी शेअर केला आहे. या फोटोत आपण पाहू शकाल सलमान आईच्या मांडीवर आरामात डोकं ठेवून विश्रांती घेताना दिसत आहे. या क्षणी मुलगा आणि आईच्या चेहऱ्यावर छानसं हास्यही उमटलं आहे. खरंतर या हास्यानं या फोटोत अधिक आनंद भरला आहे. या फोटोला सलमाननं छानसं कॅप्शन दिलं आहे. त्यानं लिहिलंय,''मां की गोद..जन्नत|'' सलमान खान चा आईसोबतचा हा फोटो त्यांच्या चाहत्यांच्या भलताच पसंतीस उतरला आहे. काहीच तासात त्याच्या या फोटोला तब्बल १८ लाखापेक्षा अधिक व्ह्यूज आले आहेत. तसंच त्याच्या चाहत्यांनी प्रतिक्रिया देताना हार्ट इमोजीही पोस्ट केले आहेत आणि आपली पसंती दर्शवली आहे.

सलमान खानच्या सिनेमांविषयी बोलायचं झालं तर नुकताच अभिनेत्याचा 'अंतिम' सिनेमा भेटीस आला होता. सलमाननं आपल्या लहान बहिणीचा नवरा आयुष शर्मा याच्यासाठी खास हा सिनेमा काढल्याची चर्चा होती. सध्या सलमान 'टायगर ३' च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या सिनेमात सलमानसोबत कतरिना कैफही दिसणार आहे. त्याचबरोबर सलमानचा 'कभी ईद कभी दिवाली' हा सिनेमाही आपल्या भेटीस येणार आहे. हा सिनेमा पुढच्या वर्षी ख्रिसमसला प्रदर्शित होणार असल्याचं बोललं जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Trump wishes Modi : ट्रम्प यांनी केला मोदींना फोन दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा अन् म्हणाले...

High Court Decision : उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय! अवैध विवाह संबंधातून जन्मलेल्या मुलाला वडिलांच्या मालमत्तेत वाटा मिळण्याचा हक्क

Athletics Championships: छत्रपती शिवाजी महाराज की जय! चीनमध्ये सर्वेश कुशारेची जागतिक मैदानी स्पर्धेत अभिमानास्पद कामगिरी

Israel-Gaza War: इस्राईलकडून गाझा शहरात लष्करी कारवाईला सुरुवात; नागरिकांना दक्षिणेकडे निघून जाण्याचं आवाहन

Devendra Fadnavis: ''मी शंभर रुपये द्यायला तयार आहे, पण...'' उद्धव ठाकरेंच्या भाषणावरुन फडणवीसांचं आवाहन

SCROLL FOR NEXT