Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan Conroversy Esakal
मनोरंजन

Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan: सलमानचा 'लुंगी डान्स' संकटात .. दक्षिण भारतातील परंपरेचा अपमान झाल्याची होतेय ओरड..

सलमानच्या 'किसी का भाई,किसी की जान' या सिनेमातील Yentamma हे नवं गाणं रिलीज होताच जेवढं गाजलं तेवढंच वादात ओढलं जात आहे.

प्रणाली मोरे

Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan Conroversy: सलमान खानचा आगामी सिनेमा 'किसी का भाई किसी की जान' या सिनेमातील नवं गाणं Yentamma रिलीज झाल्यापासून चर्चेत आलं आहे. या गाण्यामध्ये सलमान खान सोबत साऊथचे अनेक सेलिब्रिटी आणि काही टी.व्ही स्टार्स नजरेस पडत आहेत.

गाणं जोरदार व्हायरल होताना दिसत आहे, पण यादरम्यान बातमी आली आहे की साऊथ इंडियन प्रेक्षकांना या गाण्याविषयी खूप साऱ्या तक्रारी आहेत. आरोप आहे की गाण्याचं नृत्यदिग्दर्शन करताना अनेक गोष्टी चुकीच्या पद्धतीनं दाखवण्यात आल्या आहेत.(Salman Khan Yentamma Controversy kisi ka bhai kisi ki jaan people opposing outfit)

गाण्यामध्ये लूंगीला एक प्रॉपर्टी म्हणून वापरलंय..जसं सलमानच्या 'मुझसे शादी करोगी' सिनेमात टॉवेलला वापरलं गेलं होतं. दक्षिणेत पुरुष वर्ग लुंगी म्हणजे 'वेस्थी' वापरतात..तो त्यांचा पारंपरिक पोशाख आहे. तिथल्या लोकांचे म्हणणे आहे की लुंगीला तुम्ही सामान्य कपडयाचा दर्जा देऊ शकत नाही. एका लुंगीला धोती म्हणून नेसणं ही देखील साऊथमध्ये सामान्य गोष्ट समजली जात नाही. पण गाण्यात मात्र लुंगी म्हणजे वेस्थीचा दर्जाच पाडला आहे.

निवृत्त भारतीय क्रिकेटर लक्ष्मण श्रीरामाकृष्णननं ट्वीटरवर याचा विरोध केला आहे. त्यानं लिहिलं आहे की,''हे तर निव्वळ आमच्या दाक्षिणात्य परंपरेचा अपमान आहे. ही लुंगी नाही,ही धोती आहे. ही एक क्लासिकल आऊटफिट आहे,ज्याला खूप वाईट पद्धतीनं दाखवण्यात आलं आहे''.

रिपोर्टनुसार एका तामिळ-हिंदी अभिनेत्यानं देखील गाण्यात धोतीला ज्या पद्धतीनं दाखवलंय त्यावर आक्षेप घेतला आहे.

क्रिकेटर लक्ष्मण पुढे म्हणाला- ''वेस्थी परिधान करुन ते लोक धुम्रपान करत होते? त्यांना माहित तरी आहे का दक्षिण भारतीयांसाठी वेस्थी किती पवित्र असते. सलमान खानचं बोलायचं झालं तर एकवेळ त्याला हे माहित नाही असं मानून चालू पण व्यंकटेश दग्गुबाती आणि रामचरण तर तेलुगु अभिनेते आहेत.ते कसा काय वेस्थीचा अनादर करू शकतात. आणि हे तर वेस्थी नाहीय,त्यांनी धोतीला वेस्थी सारखं परिधान केलंय''.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NAM : भारताचा सर्वात मोठा विजय, ९३ धावांनी नामिबियाला नमवले; पाकिस्तानला चेपले, रविवारी IND vs PAK मध्ये Super 8s चा फैसला

IND vs NAM : भारतीय संघावर 'Fixing' चा आरोप! इशान किशनच्या विकेटवरून पाकड्यांनी वाद पेटवला, नेमकं काय घडलं?

Imran Khan Jail Torture : इम्रान खान यांचा तुरुंगात छळ सुरू ; एक डोळा पूर्णपणे निकामी होण्याच्या मार्गावर!

Education Reform : विद्यापीठांवर फसवणुकीचे गुन्हे दाखल करावेत का ? सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभय बंग यांचा सवाल

Ahmedabad Plane Crash: अहमदाबाद विमान अपघातात पायलट दोषी? इटालियन वृत्तपत्राच्या दाव्यावर भारताची प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT