Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan
Lets Dance Chotu Motu
Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan Lets Dance Chotu Motu  Esakal
मनोरंजन

Salman Khan: दुष्काळात तेरावा..! बॉक्स ऑफिसवर कमाई होत नसतांनाच भाईजानसमोर मोठी समस्या! ईसीएने 'या' गाण्यावर आक्षेप

Vaishali Patil

बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खानचा 'किसी का भाई किसी की जान' हा चित्रपट ईदच्या मुहूर्तावर चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. चित्रपटाची सुरुवात अपेक्षेप्रमाणे झाली नाही परंतु त्याची जादू आठवड्याच्या शेवटी चालली आहे. तरीही सलमानच्या इतर चित्रपटांच्या तुलनेत त्याचा हा चित्रपट अजुन कमाईच्या बाबतीत खुप मागे आहे.

या चित्रपटाने रिलीजच्या चार दिवसांत 78.34 कोटी रुपयांची कमाई केली आहे. त्याचबरोबर जगभरात 'किसी का भाई किसी की जान'ने 100 कोटींहून अधिक कमाई केली आहे. ऐकीकडे या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर समिश्र प्रतिसाद मिळत आहे तर दुसरी कडे या चित्रपटावरुन नवीन वाद सुरु झाला आहे.

सलमान खानच्या या चित्रपटात अनेक गाणी आहेत .त्यातील एक गाणे म्हणजे ' लेट्स डान्स छोटू-मोटू ' . या गाण्यात अनेक नर्सरी राइम्स वापरण्यात आल्या आहेत.हे गाणे हनी सिंगने संगीतबद्ध केले असून चित्रपटाची संपूर्ण स्टारकास्ट त्यावर शेवटी नाचताना दिसत आहे. ट्विंकल ट्विंकल, हम्प्टी डम्प्टी, जॅक एन जिल, मेरी हॅड ए लिटल लँब आणि रिंगा रिंगा रोझेस या नर्सरी राइम्स गाण्यात वापरण्यात आल्या आहेत.

मात्र या गाण्याने आता लहान मुलांचे पालक संतप्त झाले आहेत. या गाण्यात लहान मुलांचे यमक आणि गाणी विचित्र पद्धतीने वापरण्यात आली आहेत.

मुंबईतील अर्ली चाइल्डहुड असोसिएशनने या गाण्यातील नर्सरी राइम्सला 'सेन्सलेस' म्हटले आहे. संघटनेने बॉलिवूडला खुले पत्र लिहिले आहे. असोसिएशनच्या म्हणण्यानुसार, सलमान खान मुलांमध्ये खूप लोकप्रिय आहे आणि त्याच्या गाण्याच्या रूपाने 'सेन्सलेस राइम्स' आता लहानांच्या वाढदिवसाच्या पार्टीत वाजवण्यात येणार आहे.

अर्ली चाइल्डहुड असोसिएशनच्या अध्यक्षा डॉ. स्वाती पोपट वत्स म्हणाल्या की, “ज्या वेळी पालक आणि शाळा या जुन्या यमकांपासून दूर जाण्याचा प्रयत्न करत आहेत, तेव्हा या सर्व गोष्टींचा पुनरुच्चार करणारा चित्रपट आला आहे! सलमान खानची मुलांमध्ये जबरदस्त फॅन फॉलोइंग आहे. याचा अर्थ असा की या निराधार कविता आता त्यांच्या आई मुलांच्या वाढदिवसाच्या पार्टीत वाजवतील."

आता यामुळे अर्ली चाइल्डहुड असोसिएशनने सलमानच्या या गाण्यावर आक्षेप घेतल्यानं आता पुन्हा वेगळा वाद सुरु होण्याची शक्यता आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray: "मोदी आता गल्ली-बोळातही रोड शो करतील..." राज्यातील प्रचारसभांवरून ठाकरेंचा पंतप्रधानांना टोला

Rahul Gandhi Accepts Challenge: आव्हान स्वीकारलं! PM मोदींसोबत जाहीर चर्चेसाठी राहुल गांधी तयार, म्हणाले, 'पण ते...'

Kolhapur Rain : कोल्हापूरसह कागल, इचलकरंजी, गडहिंग्लज, शिरोळमध्ये दमदार पाऊस; 'इतक्या' लाखांचं नुकसान, आजही पावसाची शक्यता

International Nurses Day 2024 : जिच्यासाठी आंतरराष्ट्रीय परिचारीका दिवस साजरा केला जातो ती फ्लोरेंस नाइटेंगल कोण होती?

दहशतवादी निज्जरच्या हत्येप्रकरणी आणखी एका भारतीयाला अटक, कॅनडा पोलिसांनी आतापर्यंत ४ जणांना घेतलं ताब्यात

SCROLL FOR NEXT