sam bahadur first song badhte chalo out now starring vicky kaushal  Esakal
मनोरंजन

Sam Bahadur: विकीच्या 'सॅम बहादूर'च्या पहिल्या गाण्यात छत्रपती शिवरायांना मानवंदना, बघा व्हिडीओ

सॅम बहादूर सिनेमातल्या पहिल्या गाण्यात भारतीय जवान शिवरायांचा जयघोष करताना दिसत आहेत

Devendra Jadhav

Sam Bahadr Badhte Chalo Song:

सॅम बहादूर सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. विकी कौशल सिनेमात प्रमुख भुमिकेत आहे. सॅम बहादूर सिनेमा फील्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांच्या जीवनावर आधारीत आहे.

सॅम बहादूर सिनेमाची उत्सुकता शिगेला आहे. अशातच सॅम बहादूर सिनेमातलं पहिलं गाणं आज भेटीला आलंय. या गाण्याचं नाव बढते चलो. विशेष गोष्ट म्हणजे या गाण्यात भारतीय जवान शिवरायांचा जयघोष करताना दिसत आहेत.

सॅम बहादूर सिनेमातल्या गाण्यात शिवरायांचा जयघोष

सॅम बहादूर सिनेमातलं पहिलं गाणं भेटीला आलंय. या गाण्याचं नाव बढते चलो. या गाण्यात भारतीय जवान युद्धासाठी सज्ज असुन फील्ड मार्शल सॅम माणेकशॉ त्यांना मार्गदर्शन करताना दिसत आहेत.

प्रतिकूल परिस्थितीत शत्रूंशी दोन हात करणारे भारतीय जवान दिसत आहेत. विशेष गोष्ट म्हणजे युद्धभुमीत अंगात बळ आणण्यासाठी भारतीय जवान छत्रपती शिवरायांचा नारा लगावताना दिसत आहेत. याशिवाय दुर्गा माता, बजरंगबली, बिरसा मुंडा आणि अखेरीस भारतमातेचा जयघोष करताना भारतीय जवान दिसत आहेत. हे गाणं ऐकून संकटाचा सामना करण्याची ताकद सर्वांना मिळेल.

फील्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांचा जीवनपट

१९७१ साली भारत आणि पाकिस्तान युद्धामध्ये मोठी कामगिरी केलेल्या फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांची गोष्ट सॅम बहादूर चित्रपटातून सांगण्यात आली आहे. त्यात जनरल सॅम माणेकशॉ यांची भूमिका विकी कौशलनं साकारली आहे.

सॅम माणेकशॉ यांनी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींसमोर त्यांची भारतीय सैन्याबद्दल त्यांची ठाम भूमिका मांडली होती.

या तारखेला सॅम बहादुर येणार भेटीला

 सॅम बहादुर या चित्रपटात विकी कौशल, सान्या मल्होत्रा, फातिमा साना शेख असे कलाकार झळकणार आहेत. या सिनेमाचं दिग्दर्शन मेघना गुलजार यांनी केलंय.

सॅम बहादुर चित्रपट १ डिसेंबर रोजी चित्रपटगृहामध्ये येणार आहे. त्याची टक्कर रणबीर कपूरच्या अॅनिमल सोबत असणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Crime News : महिलेच्या नावाने इंस्टाग्राम अकाउंट काढलं अन् नको ते व्हिडिओ टाकले... मुंबईत नेमक काय घडलं?

Latest Marathi News Live Update: अमित शाह शिर्डीच्या साई मंदिरात दाखल

'माधुरी तुला ब्लाऊज काढावा लागेल' दिग्दर्शकाने केली अभिनेत्रीकडे विचित्र मागणी, म्हणाले... 'आम्ही तुला अंर्तवस्त्रामध्ये'

Helicopter News : नादच पुरा केला ! कोल्हापूरच्या पठ्ठ्याने हेलिकॉप्टर विकत घेतलं, सांगलीत सासऱ्याला दाखवायला गेल्यावर जावयाचं केलं असं स्वागत...

कफ सिरपमध्ये ब्रेक ऑइलचं विषारी केमिकल, किडनी निकामी होऊन १४ मुलांचा मृत्यू; औषधावर घातली बंदी

SCROLL FOR NEXT