Sam bahadur movie ott release date republic day 2024 vicky kaushal SAKAL
मनोरंजन

Sam Bahadur OTT: विकी कौशलचा 'सॅम बहादूर' या खास दिवशी ओटीटीवर धडकणार, जाणून घ्या सविस्तर

सॅम बहादूर सिनेमा या तारखेला येणार OTT वर

Devendra Jadhav

Sam Bahadur OTT News: विकी कौशलच्या सॅम बहादूर सिनेमा प्रेक्षक आणि समीक्षकांना दोघांनाही आवडला. सॅम बहादूर सिनेमा रणबीरच्या अॅनिमल समोर रिलीज झालेला. तरीही सॅम बहादूरने बॉक्स ऑफीसवर चांगली कमाई केलीय.

थिएटर गाजवल्यानंतर सॅम बहादूर सिनेमा आता OTT रिलीजसाठी सज्ज झालाय. मेकर्सनी सॅम बहादूरच्या ओटीटी रिलीजसाठी एक खास दिवस निवडलाय. जाणून घ्या सविस्तर.

(Sam bahadur movie ott release date)

या दिवशी सॅम बहादूर येणार OTT वर

यापुर्वी चर्चा होती की सॅम बहादूर सिनेमा ख्रिसमसच्या दिवशी ओटीटीवर रिलीज होईल. पण सिनेमाला चित्रपटगृहात मिळणारा प्रतिसाद बघता सॅम बहादूरची ओटीटी रिलीज डेट पुढे ढकलण्यात आलीय.

पिंकविलाने दिलेल्या वृत्तानुसार, सॅम बहादूर थिएटरमध्ये रिलीज झाल्यानंतर सुमारे 8 आठवड्यांनंतर OTT वर प्रदर्शित होईल. त्यामुळे नवीन वर्षात प्रजासत्ताक दिनी सॅम बहादूर ZEE 5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार असं सांगण्यात येतंय

सॅम बहादूरचं बॉक्स ऑफीस कलेक्शन

अॅनिमलच्या तुलनेत सॅम बहादूरला बऱ्याच अंशी कलेक्शनच्या बाबत अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे. अॅनिमलच्या शो ला प्रेक्षकांची तुफान गर्दी आहे. सॅम बहादूरला तेवढा प्रतिसाद नाही. पण तरीही सॅम बहादूरने बॉक्स ऑफीसवर बऱ्यापैकी चांगली कामगिरी केलेली दिसतेय.

एकीकडे अॅनिमलने ४०० कोटींपेक्षा जास्त कमाई केली असून दुसरीकडे सॅम बहादूरनं आता पर्यत ३५ कोटींपेक्षा जास्त कमाई केलीय.

सॅम बहादूरची तगडी स्टारकास्ट

सॅम बहादूर सिनेमात विकी कौशलने फील्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांची भूमिका सांगितली आहे. या चित्रपटामध्ये सान्या मल्होत्रा, फातिमा सना शेख यांच्या प्रमुख भूमिका आहेत. त्यांच्या अभिनयाचे देखील कौतुक होत आहे. अॅनिमलच्या प्रचंड प्रतिसादापुढे सॅम बहादूर काहीसा झाकोळला गेला आहे. मात्र येत्या काही दिवसांत तो चांगली कमाई करेल असे बोलले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: शुभमन गिलने जिंकलं 'दिल'! ऐतिहासिक कामगिरी अन् इंग्लंडला न पेलवणारे लक्ष्य; भारताच्या १०००+ धावा

Central Railway: मध्य रेल्वेची ज्येष्ठांसाठी मोठी घोषणा

Rabri Devi Statement : तेजप्रताप यादव प्रकरणावर पहिल्यांदाच राबडी देवींनी सोडलं मौन अन् जाहीर कार्यक्रमात, म्हणाल्या...

लग्न न करताच ४० व्या वर्षी जुळ्या मुलांची आई होणार अभिनेत्री; म्हणाली, 'आपल्याकडे एकटी स्त्री...

Aurangabad Murder Case : काकाच्या प्रेमात पडलेल्या महिलेने ४० लाख अन् प्लॉट हडपण्यासाठी काढला पतीचा काटा!

SCROLL FOR NEXT