Samaira Marathi Movie release on 26th August Google
मनोरंजन

26th August ला भेटीस येतेय समायरा, मेकर्स का म्हणतायत ही एक असाधारण गोष्ट?

या सिनेमाच्या पोस्टरवर अभिनेत्री केतकी नारायण अव्हेंजर बाईक चालवताना दिसली अन् चर्चेत आली.

प्रणाली मोरे

ऋषी श्रीकृष्ण देशपांडे दिग्दर्शित 'समायरा' (Samaira) या चित्रपटाची(Marathi Movie) नुकतीच सोशल मीडियावर घोषणा करण्यात आली असून येत्या २६ ऑगस्ट(26th August) रोजी ‘समायरा’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पोस्टरमध्ये केतकी नारायण (Ketki Narayan) अव्हेंजर चालवताना दिसत असून तिच्या चेहऱ्यावर एक ध्येय साध्य करण्याचा आत्मविश्वास दिसत आहे. तिच्या ध्येयापर्यंतचा हा असाधारण प्रवास आपल्याला या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.(Samaira Marathi Movie release on 26th August)

‘समायरा’चे दिग्दर्शक ऋषी देशपांडे म्हणतात, " प्रत्येक जण आयुष्य जगण्यासाठी एक प्रवास करत असतो. तसाच एक असाधारण प्रवास ‘समायरा’चाही असणार आहे. तिचा हा प्रवास तिचे ध्येय साध्य करणार का, हे लवकरच प्रेक्षकांना कळणार आहे. सध्या मराठी चित्रपटसृष्टीत अनेक नवनवीन विषय हाताळले जात आहेत. ही कथाही खूप वेगळी आहे. ‘समायरा’चा हा प्रवास प्रेक्षकांना नक्कीच सकारात्मकता देईल."

ग्लोबल सेवा एलएलपी प्रस्तुत, अद्योत फिल्म्सच्या सहयोगाने, या चित्रपटाची निर्मिती डॉ. जगन्नाथ सुरपूरे, रतन सुरपूरे, शशिकांत पनत, योगेश आळंदकर आणि ऋषी श्रीकृष्ण देशपांडे यांनी केली असून या चित्रपटाची पटकथा आणि संवाद सुमित विलास तांबे यांचे आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा M. Chinnaswamy Stadium वरील हा शेवटचा सामना कसा? नेमकी भानगड काय? Explained

IPL 2026 Point Table: विराट कोहलीचे शतक हुकले, देवदत्त पडिक्कलने चागंलेच झोडले; RCB चा घरच्या मैदानावरील शेवटच्या लढतीत विजय

Paytm Bank: पेटीएम पेमेंट्स बँकेचा परवाना रद्द! वापरकर्त्यांवर काय परिणाम होणार? पेमेंट करता येणार का? जाणून घ्या...

Manohar Mama Arrested: आणखी एका बाबाला अटक! स्वतःला बाळूमामाचा अवतार सांगायचा; कुर्डुवाडीत गुन्हा दाखल

RCB vs GT Live: विराट कोहलीने इतिहास रचला! IPL मध्ये असा पराक्रम करणारा पहिलाच फलंदाज ठरला; गेल, रोहितच्या यादीत स्थान

SCROLL FOR NEXT