Samantha On Naga Sobhita Dating Rumours  Esakal
मनोरंजन

Samantha: 'त्याला प्रेमाची कदर नाही म्हणून', नागा चैतन्य अन् शोभिताच्या नात्यावर सामंथा जरा स्पष्टच म्हणाली

ल्या काही दिवसांपासून नागा चैतन्य पुन्हा एकदा त्याच्या प्रेमप्रकरणामुळे चर्चेत आहे. तो शोभिता धुलिपाला डेट करत असल्याच्या चर्चाना सध्या उधाण आले आहे.

Vaishali Patil

साउथ इडस्ट्रीतील पावर कपल म्हणून नागा चैतन्य आणि सामंथा रुथ प्रभू ओळखले जात होते. नागा चैतन्य आणि सामंथा रुथ प्रभू हे दक्षिण चित्रपटातील प्रसिद्ध जोडप्यांपैकी एक होते.

त्याची जोडी चाहत्यांना खुप आवडत होती. मात्र त्याच्या नातं जास्त काळ टिकू शकलं नाही. लग्नाच्या चार वर्षानंतर दोघेही एकमेकांपासून वेगळे झाले. त्याच्या घटस्फोटाने त्याच्या चाहत्यांना मोठा धक्काच बसला.

मात्र आता गेल्या काही दिवसांपासून नागा चैतन्य पुन्हा एकदा त्याच्या प्रेमप्रकरणामुळे चर्चेत आहे. तो शोभिता धुलिपाला डेट करत असल्याच्या चर्चाना सध्या उधाण आले आहे.

नुकताच सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल झाला, या फोटोमध्ये नागा हॉटेलच्या शेफसोबत फोटो काढताना दिसत आहे आणि शोभिता साडी नेसलेली दिसत आहे. तिने तिचा चेहरा दिसू नये म्हणु चेहऱ्यावर हातही ठेवला होता. रिपोर्ट्समध्ये हे चित्र लंडनचं असल्याचं सांगण्यात येत आहे.

आता या प्रकरणावर नागा चैतन्याची माजी पत्नी आणि अभिनेत्री सामंथा रुथ प्रभूची प्रतिक्रिया समोर आली आहे. त्यामुळे नागा आणि शोभिता एकमेकांना डेट करत आहेत ही चर्चा खरी असल्याचं बोललं जात आहे.

सध्या सामंथा तिच्या शाकूंतल या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये ती सध्या व्यस्त आहे. दरम्यान अलीकडेच सियासत डेलीशी संवाद साधताना सामंथाम्हणाली की, कोण कोणासोबत रिलेशनशिपमध्ये आहे याची तिला पर्वा नाही.

ती पुढे म्हणाले, "ज्यांना प्रेमाची किंमत कळत नाही ते लोकांना अश्रू देऊन सोडून देतील, ज्यांना ते डेट करतील." सामंथा म्हणाली, “किमान त्या मुलीने तरी आनंदी असलं पाहिजे. जर त्याने त्याचं वागणं बदललं. जर तो कुणाला दु:ख देत नसेल तर ते सर्वांसाठी चांगले होईल."

नागा चैतन्य आणि सामंथा यांचे लग्न २०१७ मध्ये झाले होते. त्याच वेळी, ऑक्टोबर 2021 मध्ये दोघांनी एकमेकांपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला होता.

याबाबत माहिती देताना दोघांनी सोशल मीडियावर एक स्टेटमेंट शेअर केले होते, त्यानंतर ते वेगळे झाले. तर दुसरीकडे शोभिताबद्दल असे बोलले जात आहे की ती आणि नागा जवळपास 6 महिन्यांपासून डेट करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT