Samantha Ruth Prabhu Esakal
मनोरंजन

Samantha: 'अनुष्कासोबत चित्रपट नाहीच..', समांथानं स्पष्टच सांगितलं

Vaishali Patil

Samantha on Anushka Sharm: सध्या मनोरंजन विश्वावर साउथ चित्रपटांचा वर्चस्व पहायला मिळत आहे. त्यातच साउथ अभिनेत्रींचीही खुपच चर्चा असते. अनेक सौदर्यंवती दाक्षिणात्य मनोरंजन विश्वात आहेत. त्यातच अभिनेत्री समांथा रुथ प्रभू तिच्या अभिनयाबरोबरचं सौदर्यंसाठीही लोकप्रिय आहे.

समांथा रुथ प्रभू हिने आपल्या अभिनयाने इंडस्ट्रीत एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. तिचा 'शकुंतलम' हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. त्यानंतर आता ती बॉलिवूड सिनेमांतही झळकणार आहे. ती वरुण धवनसोबत सिटाडेलमध्ये दिसणार आहे.

अशातच समांथा आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्याबद्दल एक बातमी खुप चर्चेत होती. ती म्हणजे या दोन्ही एका प्रोजेक्टमध्ये एकत्र दिसणार आहेत. या बातमीनंतर दोघांचे चाहते खूप उत्साहित झाले होते. अनेक चर्चाही सुरु झाल्या होत्या. मात्र आता सामंथानं या वृत्ताचे खंडण केले आहे.

त्याच झालं असं की, अलीकडेच काही मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला होता की समंथा आणि अनुष्का एका वेब सीरिजसाठी एकत्र येत येणार आहे. ही वेबसिरिज महिला-केंद्रित असल्याचंदेखील बोलल जात होतं. त्याचबरोबर या प्रोजेक्टसाठी दोन्ही तयार आहेत आणि महत्वाच म्हणजे या वेबसिरिजचा निर्मिता हा अनुष्का शर्माचा भाऊ कर्णेश शर्मा करणार आहे.

आता या विषयी जेव्हा समांथाला विचारण्यात आले त्यावेळी मात्र अभिनेत्रीने या बातमीचे खंडण केले. तिने या बातमीला स्पष्ट नकार दिला. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सामंथानं सांगितल की ती तिच्या करिअरमध्ये असा कोणताही प्रोजेक्ट करत नाही आहे. तिने अनुष्का शर्मासोबत इतर कोणत्याही प्रोजेक्टसाठी एकत्र येणार नाही. या बातमीनंतर समंथा आणि अनुष्काचे चाहते थोडे नाराज झाले आहेत. मात्र त्यांना नक्कीच या दोघांची जोडी एकत्र पहाण्यासाठी उत्सूक आहेत.

सामंथाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर ती सध्या खुशी या रोमँटिक ड्रामाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे, ज्यावर तिला विशेष लक्ष केंद्रित करायचे आहे. या चित्रपटात अभिनेत्री साऊथ सुपरस्टार विजय देवरकोंडा सोबत दिसणार आहे. तर दुसरीकडे ती वरुण धवनसोबत सिटाडेल या वेबसिरिजमध्येही दिसणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"ट्रम्पला ठार मारणे हे आपले कर्तव्य!" ; इराणमध्ये खामेनींच्या अंत्यविधीवेळी चिथावणीखोर घोषणाबाजी, मोठ्या प्रमाणात गर्दी

Nitesh Rane Non Bailable Warrant : नितेश राणेंना गोवा पोलिस अटक करणार? अजामीनपात्र वॉरंट; टोलनाका तोडफोड प्रकरणात न्यायालयाची कारवाई

Marathi Live Updates : पाताळगंगा नदीच्या पुरात एसटी बस अडकली; आठ प्रवाशांची सुखरूप सुटका

Ramdas Athawale: ठाकरेंनी रामरक्षा नव्हे तर ‘शिवसेना रक्षा’ आंदोलन करावे; मंत्री आठवलेंचा टोला

Chhatrapati Sambhinagar: जिल्हा मध्यवर्ती बँकेत महायुतीची सरशी; कॉंग्रेसचे एकमेव खा. डॉ. कल्याण काळे यांचा ४८ मतांनी विजय

SCROLL FOR NEXT