samantha  Sakal
मनोरंजन

Shaakuntalam BO Collection: सामंथाचा 'शाकुंतलम' बॉक्स ऑफिसवर फ्लॉप, पाचव्या दिवसाची कमाई जाणून बसेल धक्का

सामंथा रुथ प्रभूचा 'शाकुंतलम' हा 2023 च्या बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक होता.

Aishwarya Musale

सामंथा रुथ प्रभूचा 'शाकुंतलम' हा 2023 च्या बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक होता. 14 एप्रिल रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला आहे. चित्रपट कमाईसाठी खूप संघर्ष करत आहे. 'शाकुंतलम' रिलीज होऊन 5 दिवस झाले आहेत आणि या चित्रपटाने देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर 10 कोटींचा आकडाही गाठलेला नाही.

सुमारे 65 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनलेल्या 'शाकुंतलम'च्या कमाईच्या आकड्यांनी निर्मात्यांचे टेन्शन वाढवले ​​आहे. 'शाकुंतलम'ने पाचव्या दिवशी किती कमाई केली आहे ते जाणून घेऊया.

सामंथाचे 'शाकुंतलम' हे एक मायथोलॉजिकल ड्रामा आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन गुणशेखर यांनी केले आहे. हा चित्रपट संपूर्ण भारतभर अनेक भाषांमध्ये प्रदर्शित झाला. चित्रपटाच्या कमाईबद्दल बोलायचे झाले तर, 'शाकुंतलम'ची ओपनिंगही काही खास नव्हती आणि त्याने बॉक्स ऑफिसवर केवळ 2.7 कोटींची कमाई केली. तेव्हापासून चित्रपटाच्या कमाईत सातत्याने घट होत आहे.

दरम्यान, 'शाकुंतलम'च्या पाचव्या दिवशी म्हणजेच पहिल्या मंगळवारी कमाईचे अंदाजे आकडेही आले आहेत. रिपोर्टनुसार 'शाकुंतलम'ने पाचव्या दिवशी 50 लाखांचा बिझनेस केला आहे. यासह चित्रपटाचे एकूण कलेक्शन आता 6.85 कोटी रुपयांवर पोहोचले आहे.

शाकुंतलम हे एक पौराणिक नाटक आहे ज्याचे लेखन आणि दिग्दर्शन गुणशेखर यांनी केले आहे. हा चित्रपट कालिदासाच्या अभिज्ञान शाकुंतलम या नाटकावर आधारित आहे. 'शाकुंतलम'मध्ये सामंथा शकुंतलाची भूमिका साकारत आहे तर देव मोहनने पुरू घराण्यातील राजा दुष्यंतची भूमिका साकारली आहे.

सचिन खेडेकर, मोहन बाबू, अदिती बालन, अनन्या नागल्ला, प्रकाश राज, गौतमी, मधु आणि जिशू सेनगुप्ता सहाय्यक कलाकारांमध्ये आहेत. अभिनेता अल्लू अर्जुनची मुलगी अल्लू अरहा हिनेही या चित्रपटात राजकुमार भरतच्या भूमिकेत खास कॅमिओ केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Today : चार दिवसांनंतर शेअर बाजार ‘हिरवा’ पण लगेचच ‘लाल’; कोल इंडियाचा IPO आजपासून खुला; कोणते शेअर्स घसरले?

धुरंधरला टक्कर देण्यासाठी सज्ज ‘द राजा साब’; प्रदर्शित होण्याआधीच झालेली कोट्यवधींची कमाई, आजचं कलेक्शन किती?

Ambadas Danve : छत्रपती संभाजीनगरला आठ दिवसांआड पाणी हे सरकारचे पाप

CM Devendra Fadnavis : दोन महिन्यांत मिळणार शहराला रोज पाणी! मुख्यमंत्र्यांनी दिली नवी डेडलाइन

Crime News : धक्कादायक! व्यसनाच्या त्रासाला कंटाळून जन्मदात्या बापानं केला मुलाचा खून; Heart Attack ने मृत्यू झाल्याचा केला होता बनाव

SCROLL FOR NEXT