Samantha and Varun Dhawan Sakal
मनोरंजन

Samantha Ruth Prabhu: 'सिटाडेल' मध्ये रंगणार समंथाची वरुण धवनसोबत जोडी

अभिनेत्री समंथा रुथ प्रभू हिची ‘सिटाडेल’ या वेब सीरिजमध्ये एन्ट्री झाली आहे.

सकाळ डिजिटल टीम

जेव्हा जेव्हा साऊथ सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेत्रीची चर्चा होते तेव्हा समंथा रुथ प्रभूचे नाव टॉप लिस्टमध्ये येते. सामंथाला वेगळ्या ओळखीची गरज नाही, अभिनेत्री समंथा रुथ प्रभू हिची ‘सिटाडेल’ या वेब सीरिजमध्ये एन्ट्री झाली आहे. अभिनेता वरुण धवनसोबत या सीरिजमध्ये समंथा मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तसेच सध्या ‘शाकुंतलम’ या चित्रपटामुळे समंथा चर्चेत आहे. रुसो ब्रदर्सच्या हॉलिवूड वेब सीरिज 'सिटाडेल'च्या भारतीय व्हर्जनमध्ये समंथाची वर्णी लागली आहे. नुकतीच याची अधिकृत घोषणा करण्यात आली.

इन्स्टाग्राम अकाऊंटवर Amazon Prime Video याची घोषणा केली आहे. तसेच या सीरिजमधील समंथाचा एक लूकही आपल्याला पाहायला मिळत आहे. लेदर जॅकेट, सनग्लासेस आणि ब्लॅक जीन्समध्ये एखाद्या रॉ एजंटसारखी समंथा दिसत आहे. समंथाच्या या फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, 'मिशन सुरू झाले आहे. आम्ही सिटाडेलचे भारतीय व्हर्जनसाठी तयार आहोत.’ मात्र, अभिनेत्री समंथाचा हा लूक सीरिजमधील आहे की, प्रमोशनल हे अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आले आहे.

लोकप्रिय हॉलिवूड ‘सिटाडेल’ या सीरिजच्या भारतीय व्हर्जनची घोषणा आधीच करण्यात आली होती. तसेच अभिनेता वरुण धवनसोबत गेल्या महिन्याच्या सुरुवातीला वेब सीरिजचे शूटिंगही सुरू करण्यात आले होते. सिटाडेल या सीरिजमध्ये वरुण धवन सोबत समंथाची जोडी जमणार आहे.

तसेच या सीरिजबद्दल बोलताना अभिनेत्री समंथा म्हणाली की , ‘द फॅमिली मॅन २ मध्ये काम केल्यानंतर या टीममध्ये सामील होणे माझ्यासाठी घरी परत आल्यासारखेच आहे. मला वरुणसोबत देखील पहिल्यांदाच काम करायला मिळत आहे.’

सिटाडेल सीरिजमध्ये समंथा एक वेगळ्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. मात्र, ‘सिटाडेल’च्या या भारतीय व्हर्जनचे नाव निश्चित झाले नसून, लवकरच त्याची घोषणा होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT