Naga Chaitanya esakal
मनोरंजन

Naga Chaitanya : समंथासोबत घटस्फोट घेतल्याचा नागा चैतन्यला होतोय पश्चाताप!

अखेर समंथानं इंस्टावरुन नागा चैतन्याचे फोटो डिलीट केले होते.

सकाळ डिजिटल टीम

Samantha Ruth Prabhu Naga Chaitanya Relationship actor : साऊथमधील प्रसिद्ध जोडी नागा चैतन्य आणि समंथाच्या घटस्फोटानं चाहत्यांना कमालीच्या वेदना झाल्या होत्या. त्यांच्यातील वाद टोकाला गेला आणि त्यानं एकमेकांपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला. यावर दोन्ही सेलिब्रेटी नेहमीच एकमेकांविषयी बोलताना दिसतात. आता नागा चैतन्याची एक मुलाखत व्हायरल झाली आहे.

एका मुलाखतीमध्ये नागानं आपल्या वैयक्तिक आयुष्याविषयी काही खुलासे केले आहेत. त्यामध्ये त्यानं मला आतापर्यत कोणत्याही निर्णयामुळे पश्चाताप झालेला नाही. मात्र समंथाबरोबरच्या त्या निर्णयानं अजुनही मनामध्ये वेगवेगळे प्रश्न निर्माण होत आहेत. कदाचित मी काही निर्णय खूप वेगानं घेतले असतील. त्याचा परिणाम आता दिसून येतो आहे. पण जे झाले ते झाले याविषयी फार गांभीर्यानं घेण्याची गरज नाही. असेही नागा चैतन्यानं म्हटले आहे.

Also Read : Fatty Liver Disease: संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

नागा चैतन्य आणि समंथाचा गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये घटस्फोट झाला होता. तेव्हापासून दोन्ही सेलिब्रेटींच्या चाहत्यांना वाईट वाटले होते. सोशल मीडियावर दोन्ही सेलिब्रेटींनी एकमेकांवर आरोपही केले होते. त्या आरोपांची पातळीही घसरली होती. घरातील वैयक्तिक वाद हे सोशल मीडियावर जगजाहीर झाले होते. अखेर समंथानं इंस्टावरुन नागा चैतन्याचे फोटो डिलीट केले होते.

समंथानं घटस्फोटानंतर एक पोस्ट शेयर केली होती. त्यामध्ये तिनं म्हटले होते की, भलेही आता आम्ही वेगळे झाले असू मात्र आमच्यातील मैत्रीचं नातं हे कायम राहील. पती पत्नी म्हणून आम्ही एकत्र राहू शकत नव्हतो. दोघांमध्ये सातत्यानं होणारा वाद, संवादाचा अभाव यामुळे तो कटू निर्णय घ्यावा लागला होता. असेही समंथानं म्हटले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abu Azmi Vs MNS : Video - ‘’रिक्षावाले, फेरीवाल्यांना काय मारता, मारायचंच आहे ना, तर..’’ ; अबू आझमींनी ‘मनसे’ला ललकारलं!

IND vs ENG 2nd Test: शुभमनच्या २६९ धावा अन् नंतर आकाश दीपचा भेदक मारा! इंग्लंडच्या संघाची घरच्या मैदानावर झालीय वाईट अवस्था

IND vs ENG 2nd Test : शुभमन गिल OUT होताच इंग्लंडच्या चाहत्यांनी काय केलं? विश्वास बसणार नाही, Video Viral

Chicago Firing: रेस्टॉरंटबाहेर बेछूट गोळीबार; ४ जणांचा मृत्यू, १४ जण जखमी, घटनेचा थरारक व्हिडिओ व्हायरल

Nitin Gadkari flight emergency landing : मोठी बातमी! आता नितीन गडकरींच्या विमानाचे झाले इमर्जन्सी लँडिंग; जाणून घ्या, नेमकं काय घडलं...?

SCROLL FOR NEXT